नवी दिल्ली 22 एप्रिल : माणूस आणि कुत्रा यांचं नातं खूप खास आहे. लोकांचा असा विश्वास आहे की या नात्यात श्वान अधिक निष्ठावान असतात. हे काही अंशी खरं असलं तरी काही लोकही आपल्या पाळीव कुत्र्यांसाठी जीव ओवाळून टाकतात आणि हे विधानही चुकीचं सिद्ध करतात. नुकतंच इंग्लंडमधील एका महिलेनंही असाच प्रकार केला. तिने आपल्या पाळीव कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि तिला आपला जीव गमवावा लागला (Woman Drown in Water while Saving Pet Dog). लेकीसाठी सजला होता मांडव; मात्र बापानेच उरकलं तिसरं लग्न लिव्हरपूल इकोने दिलेल्या वृत्तानुसार, ईस्टहॅम, विरल येथील रहिवासी असलेली 57 वर्षीय क्रिस्टीन रॉबिन्सन 6 जुलै 2020 रोजी मर्सी नदीच्या किनारी किंग्स परेडमध्ये तिचा मुलगा नियाल आणि पाळीव कुत्र्यासोबत फिरत होती. तेव्हाच हा श्वान एका निसरड्या जागी पोहोचला आणि तिथून वाहून गेला. दोघांनी तात्काळ कुत्र्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला .
रिपोर्ट्सनुसार, कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी महिलेनं पाण्यात उडीही मारली, पण दुःखद गोष्ट म्हणजे कुत्र्याचा जीव वाचला पण तिचा जीव वाचू शकला नाही. आरएनएलआय कोस्ट गार्ड, मर्सीसाइड पोलीस आणि नॉर्थवेस्ट रुग्णवाहिका सेवा यांनी संयुक्तपणे ऑपरेशन करून महिलेच्या मुलाची आणि कुत्र्याची सुखरूप सुटका केली. मात्र महिलेचा जीव वाचू शकला नाही. महिलेला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तिची तपासणी केली असता तिला मृत घोषित करण्यात आलं. आश्रमात नग्न परेड, महिलांना उघड्यावर अंघोळ अनिवार्य; 80 महिलांसोबतच्या घृणास्पद कृत्याचा खुलासा 20 एप्रिल रोजी होलीहेड कोस्टगार्ड व्यवस्थापक रिचर्ड जोन्स यांच्याकडे लिव्हरपूल कोरोनर्स कोर्टात क्रिस्टीनच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यात आली. तटरक्षक दलाला तात्काळ माहिती मिळाल्यावर त्यांना ३ मिनिटं उशीर कसा झाला, असं विचारण्यात आलं. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी तीन मिनिटं हा मोठा कालावधी असतो, असं न्यायालयात सांगण्यात आलं. प्रकरणाचं गांभीर्य समजण्यासाठी, महिलेला वाचवण्यासाठी टीम नेमण्यात आणि फोन उचलून प्रकरण समजून घेण्यासाठी तीन मिनिटे लागल्याचं व्यवस्थापकाने सांगितलं.