जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / लेकीसाठी सजला होता मांडव; मात्र बापानेच उरकलं तिसरं लग्न

लेकीसाठी सजला होता मांडव; मात्र बापानेच उरकलं तिसरं लग्न

लेकीसाठी सजला होता मांडव; मात्र बापानेच उरकलं तिसरं लग्न

हा सर्व प्रकार पाहून गावकरीही चक्रावले…

  • -MIN READ
  • Last Updated :

गडवा, 21 एप्रिल : झारखंडमधील (Jharkhand News) गढवा जिल्ह्यात 56 वर्षीय व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नाच्या एक दिवसापूर्वी स्वत: तिसरं लग्न केलं. वडिलांच्या तिसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या दिवशी मुलीचं लग्नही पारंपरिक पद्धतीने पार पडलं. मिळालेल्या माहितीनुसार, शिव प्रसाद वैद्य यांच्या मुलीचं लग्न 20 एप्रिल रोजी होणार होतं. मात्र वडिलांच्या बाहेरख्याली स्वभावामुळे मुलीचं लग्न अडचणीत आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शिव प्रसाद वैद्यने गावातील एका अल्पवयीन मुलीला तीन वर्षांपूर्वी पळवून छत्तीसगडला आणलं होतं. दरम्यान, आपल्या मुलीला शिवप्रसाद वैद्य याने छत्तीसगडमधील गावात भाड्याच्या घरात ठेवल्याचे वधू प्रसादला समजले. यानंतर वधू प्रसादने शिवप्रसाद यांच्या मुलीच्या लग्नात अडथळे आणण्यास सुरुवात केली, त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांच्या तपासानुसार, शिव प्रसाद याने तीन वर्षांपूर्वी प्रसाद याच्या ज्या अल्पवयीन मुलीला पळवून छत्तीसगडला आणलं होतं, ती आता पौढ झाली असून तिला एक मुलगाही आहे. हे ही वाचा- धक्कादायक! पोटच्या मुलीची विक्री करुन बापाने खरेदी केली बाईक अन् म्युझिक सिस्टम गावकऱ्यांच्या दबावामुळे वडिलांनी केलं तिसरं लग्न… स्थानिक गावकऱ्यांच्या दबावामुळे शिव प्रसाद वैद्यने प्रसाद याच्या मुलीसोबत लग्न करावं लागलं. हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचल्यानंतर शिव प्रसाद वैद्यने 19 एप्रिल रोजी लवाही गावात मंदिरातच तिसरं लग्न केलं. मुलीच्या लग्नात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्याने हे पाऊल उचललं. मुलीच्या लग्नापूर्वी वडिलांचे घेतल्या सप्तपदी.. मिळालेल्या माहितीनुसार, शिव प्रसादच्या पहिल्या लग्नानंतर त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. यानंतर त्याने दुसरं लग्न केलं. त्यातून त्याला चार मुलं आहेत. तिसऱ्या पत्नीकडूनही त्याला एक मुलगा आहे. आतापर्यंत या मुलाला त्याने लपवून ठेवलं होतं. शिव प्रसादचं तिसरं लग्न झाल्यानंतर 20 एप्रिल रोजी त्याच्या मुलीचं पारंपरिक पद्धतीने लग्न झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात