जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आश्रमात नग्न परेड, महिलांना उघड्यावर अंघोळ अनिवार्य; 80 महिलांसोबतच्या घृणास्पद कृत्याचा खुलासा

आश्रमात नग्न परेड, महिलांना उघड्यावर अंघोळ अनिवार्य; 80 महिलांसोबतच्या घृणास्पद कृत्याचा खुलासा

आश्रमात नग्न परेड, महिलांना उघड्यावर अंघोळ अनिवार्य; 80 महिलांसोबतच्या घृणास्पद कृत्याचा खुलासा

आतापर्यंत चित्रपट वा वेब सीरिजमधून आपण अशा प्रकारच्या घटना पाहिल्या आहेत, मात्र खरोखर घडलेलं हे कृत्य संताप आणणारं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल : राजधानी दिल्लीमधील रोहिणी भागातील बाबा वीरेंद्र देव दीक्षित ( Baba Virendra Dev Dixit ) यांच्या ‘आध्यात्मिक विश्व विद्यालयात’ ( aadhyaatmik vishv vidyaalay) महिलांसह वेश्या व्यवसायापेक्षाही घृणास्पद व्यवहार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मोठ-मोठ्या दरवाज्यांबाहेर त्यांचा आरडाओरडा देखील ऐकू येत नव्हता. अल्पवयीन मुली, तरुणी आणि निराधार महिलांना आश्रमात चांगली व्यवस्था असल्याचं सांगून नेलं जात होतं. यानंतर काही दिवसातच त्यांना घृणास्पद वागणूक दिली जात होती. 20 एप्रिल रोजी सुनावणीदरम्यान दिल्लीत घडलेल्या गुन्ह्याबाबत हायकोर्टाने संताप व्यक्त केला आहे. उघड्यावर अंघोळ करण्यासाठी जबरदस्ती… कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आश्रमात महिलांना अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. येथून कोणी बाहेर जाण्याचा विचारही करू शकत नव्हतं. 24 तास कडक पाहारा ठेवण्यात आला होता. कोणी याबाबत विरोध केला तर त्याला मारहाण केली जात होती. महिलांना कोणत्याही पडद्याशिवाय उघड्यावर आंघोळ करण्यास जबरदस्ती केली जात होती. अशा अवस्थेत तरुणींकडून परेडदेखील करवून घेतली जात असल्याचं सांगितलं जात आहे. 2018 मध्ये याचा खुलासा झाला होता. येथून तब्बल 40 महिलांची सुटका करण्यात आली होती. हे ही वाचा- CCTV: पुण्यात जावयाकडून सासऱ्याची निर्घृण हत्या; दुकानात शिरुन चाकूने भोसकलं दिल्ली हायकोर्टाने व्यक्त केला संताप… दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणान सुनावणी करताना आश्रमचे संचालक भगोडा वीरेंद्र देव दीक्षित यांच्या या कृत्यांवर संताप व्यक्त केला. देशाची राजधानी दिल्लीत अशा प्रकारचं कृत्य घडत असल्याने निराशा व्यक्त केली. कोर्टाने पुढे सांगितलं की, दिल्ली सरकारला आश्रमावर नियंत्रण आणण्याचे निर्देश देण्यात येणार आहे. आरोपी वीरेंद्र देव दीक्षित ब्रम्ह कुमारी संस्थेशी जोडलेला होता. या संस्थेकडून आश्रमाच्या कारभाराची माहिती घेतल्यानंतर अध्यात्म विद्यापीठ नावाने स्वतःची संस्था स्थापन केली होती. या कथित बाबाने दिल्लीतील रोहिणी भागात आपला भव्य आश्रम बांधला, जिथे 100 हून अधिक महिलांना तुरुंगात डांबून आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांचा वापर केला गेला. वाटेल तेव्हा त्यांच्यावर बलात्कार झाला. कथित बाबाची पोल डिसेंबर 2018 मध्ये उघड झाली होती, एका तक्रारीत दिल्ली पोलिसांनी आश्रम परिसरातून 40 महिलांना त्यांच्या संरक्षणाखाली ताब्यात घेतले होते. 20 एप्रिल रोजी सुनावणीत दिल्ली हायकोर्ट हैराण याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मनेका गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, पीडितेच्या पालकांना तिला भेटायचे आहे. मात्र आश्रमातील लोकांनी हे होऊ दिले नाही. अधिवक्ता गुरुस्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, या आश्रमाचा मुख्य आरोपी वीरेंद्र देव दीक्षित हा आरोपी आहे, ज्यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपीविरुद्ध 10 खटले वेगवेगळ्या न्यायालयात प्रलंबित आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , delhi , Rape
  • First Published :
जाहिरात
जाहिरात