जाहिरात
मराठी बातम्या / Viral / धक्कादायक! Bungee Jumping ची हौस जीवावर बेतली; एक चूक अन् हवेतच झाला तरुणीचा मृत्यू

धक्कादायक! Bungee Jumping ची हौस जीवावर बेतली; एक चूक अन् हवेतच झाला तरुणीचा मृत्यू

धक्कादायक! Bungee Jumping ची हौस जीवावर बेतली; एक चूक अन् हवेतच झाला तरुणीचा मृत्यू

उडी घेतल्यानंतर महिलेच्या हे लक्षात आलं, की तिनं बंजी कॉर्डच घातलेला नाही. हे लक्षात येताच तिला धक्का बसला आणि खाली कोसळण्याआधीच तिचा मृत्यू झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 24 जुलै : आजकाल लोकांना अॅडवेंचर गेम जास्त आवडतात, मात्र यामुळे अनेकांनी आपला जीवही गमवावा लागतो. असंच काहीसं घडलं 25 वर्षाच्या येसेनिया मोरालेस गोमेज हिच्यासोबत. बंजी जम्पिंगदरम्यान तिचा मृत्यू (Woman Dies In Bungee Jumping Accident) झाला आहे. कोलंबियाच्या अँटिओक्वियामधील येसेनिया मोरालेस (Yecenia Morales) गोमेज आपल्या प्रियकरासोबत बंजी जम्पिंगची तयारी करत होती. याचदरम्यान प्रशिक्षकाचं बोलणं ऐकून येसेनियानं उडी घेतली आणि जवळपास 160 फूट खोल जाऊन कोसळली. VIDEO : पुरात अडकलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना NDRF च्या पथकामुळे जीवदान तरुणीचा प्रियकर लगेचच त्याठिकाणी पोहोचला मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. यावेळी सर्वांना असं वाटलं, की खाली कोसळल्यामुळेच तरुणीचा मृत्यू झाा आहे. मात्र, मेडिकल रिपोर्टमध्ये वेगळीच बाब समोर आली. यानुसार, तिचा मृत्यू खाली कोसळून नाही तर हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. झालं असं, की पुलावरुन उडी घेतल्यानंतर महिलेच्या हे लक्षात आलं, की तिनं बंजी कॉर्डच घातलेला नाही. हे लक्षात येताच तिला धक्का बसला आणि खाली कोसळण्याआधीच तिचा मृत्यू झाला. प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट अन्…; पाहा घटनेचा थरारक VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षकानं येसेनियाच्या प्रियकराला उडी घेण्यास सांगितलं होतं, कारण त्याला आधीपासून सुरक्षा उपकरणांनी जोडलं गेलं होतं. मात्र, ही बाब लक्षात न आल्यानं गोंधळलेल्या येसेनिया हिनं स्वतःच उडी घेतली. मृत तरुणीच्या भावानं सांगितलं, की त्याच्या बहिणीला वाचण आणि नृत्याचा प्रचंड छंद होता. माझी बहीण एक खूप चांगली मुलगी होती, असं तिच्या भावानं म्हटलं आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात