Home /News /viral /

डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून 21 दिवसात 15 तरुणांना केलं डेट; महिलेनं लोकांना दिल्या खास टिप्स

डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून 21 दिवसात 15 तरुणांना केलं डेट; महिलेनं लोकांना दिल्या खास टिप्स

आता लोक ऑनलाइन डेटिंग वेबसाइट किंवा अॅप्सद्वारे अनोळखी लोकांशी कनेक्ट होतात आणि नंतर त्यांच्याशी जवळीक वाढवतात. जेव्हा दोघांच्या आवडी-निवडी जुळतात तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये येतात.

    नवी दिल्ली 25 मार्च : आजकाल डेटिंग कल्चर (Online Dating) भारतातही खूप लोकप्रिय झालं आहे. परदेशात हे वर्षानुवर्षे चालत आलं आहे. आता लोक ऑनलाइन डेटिंग वेबसाइट किंवा अॅप्सद्वारे अनोळखी लोकांशी कनेक्ट होतात आणि नंतर त्यांच्याशी जवळीक वाढवतात. जेव्हा दोघांच्या आवडी-निवडी जुळतात तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये येतात. पण या गोष्टींमध्ये फसवणूक किंवा इतर समस्यांचाही धोका असतो. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात राहणारी एक महिला लोकांना डेटिंग अॅपद्वारे डेटिंग करण्याचा योग्य मार्ग शिकवत आहे (Dating Tips). बाबो! फक्त एक मिनिट कपलने केलं असं काम; तब्बल 19 हजार कोटी रुपयांचं बिल आलं डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहणारी हेलन चिक एक लेखिका आणि डेटिंग तज्ज्ञ (Dating Expert) आहे. तिने डेटिंगशी संबंधित एक पुस्तकही लिहिलं आहे, ज्यामध्ये तिनं स्वतःच्या अनुभवांच्या आधारे लोकांना डेट कसं करावं हे सांगितलं आहे. पण हेलनची सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे तिने एकदा फक्त 21 दिवसांत 15 मुलांना डेट केलं होतं (Woman Date 15 Men in 21 Days). आपल्या अनुभवाविषयी बोलताना हेलनने सांगितलं की, जेव्हा ती न्यूयॉर्कला गेली तेव्हा तिने 21 दिवसांत 15 पुरुषांना डेट केलं. हेलन अलीकडेच किंडा सॉर्टा डेटिंग नावाच्या पॉडकास्टवर गेस्ट म्हणून उपस्थित होती, ज्यामध्ये तिने तिच्या डेटिंगचं रहस्य उघड केलं. तिने सांगितलं की तिचा दोनदा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे ती डेटिंगला खूप गांभीर्याने घेते. तिने सांगितलं की ती फक्त टिंडरद्वारे डेट करते आणि काही गोष्टींची काळजी घेऊन इतर लोक देखील टिंडरचा पुरेपूर फायदा घेऊ शकतात. लहान भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण; घरच्यांसह गावकऱ्यांनीही विरोध करताच उचललं हे पाऊल हेलनने सांगितलं की, जेव्हा कोणी दुसऱ्या शहरात जात असेल आणि तिथे डेट करण्याचा विचार करत असेल तर तेव्हा तिथे जाण्यापूर्वीच काही दिवस आधी सेटिंगमध्ये बदल करणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं लोकेशन बदला. त्यामुळे असं होईल की त्या शहरात जाण्याच्या काही दिवस आधी तुम्हाला तिथल्या लोकांचे प्रोफाईल दिसायला लागतील आणि आधीपासूनच आपल्या आवडी-निवडीच्या आधारावर आपण लोकांची निवड करू शकतो. यानंतर, तुम्ही त्याठिकाणी पोहोचल्यावर त्याच दिवशी एक छोटीशी डेट किंवा मीटिंग निश्चित करा म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीला पुढे भेटायचं की नाही हे ठरवता येईल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Online dating, Viral news

    पुढील बातम्या