मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लहान भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण; घरच्यांसह गावकऱ्यांनीही विरोध करताच उचललं हे पाऊल

लहान भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण; घरच्यांसह गावकऱ्यांनीही विरोध करताच उचललं हे पाऊल

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

दोघांमधील प्रेमाचं नातं इतकं घट्ट झालं की त्यांनी वेगवेगळं राहण्यासही नकार दिला. या दोघांनाही एकत्र जगायचं आणि मरायचं होतं, पण कुटुंब आणि समाजाने दोघांचं हे प्रेम मान्य केलं नाही.

  • Published by:  Kiran Pharate
पाटणा 25 मार्च : एक विचित्र प्रेमकहाणी (Weird Love Story) समोर आली आहे. यात बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात एक विधवा बहीण तिच्या धाकट्या भावाच्या प्रेमात पडली (Sister Fell in Love with Brother). दोघांमधील प्रेमाचं नातं इतकं घट्ट झालं की त्यांनी वेगवेगळं राहण्यासही नकार दिला. या दोघांनाही एकत्र जगायचं आणि मरायचं आहे, पण कुटुंब आणि समाजाने दोघांचं हे प्रेम मान्य केलं नाही. दोघांनाही शिक्षा व्हावी या उद्देशाने कुटुंबीयांनी पंचायत बोलावली, त्यानंतर जोडप्याने पोलीस ठाणं गाठून आपल्याला सुरक्षा पुरवून नातेवाईक आणि इतरांपासून वाचवण्याची विनंती केली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर प्रेमी युगुलाची स्थानिक लोकांच्या तावडीतून सुटका होऊ शकली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लग्न ही वैयक्तिक आवडीची बाब असून यामध्ये चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप करणं योग्य नाही. कोणी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य आणि स्थानिक लोक सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी हे नातं चुकीचं ठरवत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाऊ आणि बहिणीच्या प्रेमकथेचं हे प्रकरण बेतियाच्या बानुछापर भागातील आहे. यातील महिलेच्या पतीचं सुमारे 1 वर्षापूर्वी निधन झालं होतं. यानंतर ती वयाने 4 वर्षांनी लहान असलेल्या आपल्याच मावस भावाच्या प्रेमात पडली. दोघांमधील प्रेम इतकं वाढलं की त्यांनी एकत्र जगायचं आणि एकत्र मरायचं ठरवलं. कुटुंबीयांनी यावर तीव्र आक्षेप घेत हे प्रेमसंबंध स्वीकारण्यास नकार दिला. म्हणे, 'आम्हाला नवराही हवा एक'; एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या Best Friends शोधत आहेत एकच Husband दुसरीकडे, दोघंही लग्न करून संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचा विचार करत होते. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी दोघांनाही थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं नातेवाईकांचे म्हणणं आहे. यानंतर दोघांनाही शिक्षा व्हावी, या उद्देशाने कुटुंबीयांनी पंचायत बोलावली. यामध्ये त्यांचे केस मुंडन करून त्यांना गावात फिरवण्याचं ठरवण्यात आलं. प्रेमी युगुलाने वेळीच स्थानिक पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांच्या एन्ट्रीने या प्रकरणाला नवं वळण मिळालं. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून प्रेमी युगुलाची स्थानिक लोकांच्या तावडीतून सुटका केली. यानंतर दोघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. 'दैनिक जागरण'च्या बातमीनुसार, पोलीस अधिकाऱ्याने गावकऱ्यांना समजावून सांगितलं की, कायद्यानुसार प्रत्येकाला परस्पर संमतीने लग्न करण्याचा अधिकार आहे. यासोबतच कोणी त्रास दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. चालत्या बसमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींचा बिअर पितानाचा Video व्हायरल; अधिकाऱ्यांकडून तपासाचे आदेश प्रियकर सुनील कुमारने सांगितलं की, दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना लग्न करायचं आहे. सुनिलने सांगितलं की, त्याचे कुटुंबीय यावर खूश नाहीत आणि विरोध करत आहेत. त्याचवेळी प्रेयसीनं सांगितलं की, दोघंही लग्न करणार आहेत. तरुणी तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. महिलेच्या पतीचा गेल्या वर्षी नदीत बुडून मृत्यू झाला होता.
First published:

Tags: Love story, Viral news

पुढील बातम्या