मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बाबो! फक्त एक मिनिट कपलने केलं असं काम; तब्बल 19 हजार कोटी रुपयांचं बिल आलं

बाबो! फक्त एक मिनिट कपलने केलं असं काम; तब्बल 19 हजार कोटी रुपयांचं बिल आलं

फोटो सौजन्य - Triangle News

फोटो सौजन्य - Triangle News

एका मिनिटासाठी बिलाची इतकी रक्कम पाहून कपलला जोर का झटकाच बसला.

    लंडन, 24 मार्च : काही वेळा काही न करताही आपल्यासोबत असं काही घडतं ज्याचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो. असाच अनुभव आला तो यूकेतील एका कपलला. या कपलने फक्त एक मिनिट असं काही काम केलं ज्याचा मोठा फटका त्यांना बसला. त्यांना तब्बल 19 हजार कोटी रुपयांचं बिल आलं. एका मिनिटासाठी बिलाची इतकी रक्कम पाहून कपलला जोर का झटकाच बसला. हर्ट्समधील हार्पेंडनमध्ये राहणारे सॅम मोट्रम आणि मॅडी रॉबर्टसन. यांना आपल्या गॅसचं बिल पाहून धक्काच बसला. या कपलने सकाळी फक्त एक मिनिट गॅसचा वापर केला. त्यांना तब्बल 1.9 बिलिअन पाऊंड म्हणजे तब्बल 19,146 कोटी रुपये आलं होतं. शेल एनर्जी अॅपवर त्यांनी ही बिलाची रक्कम पाहिली. त्यांना इतकं बिल आलं होतं जी यूकेतील एकूण घरगुती गॅस आणि वीज बिलाच्या 15 टक्के रक्कम होती. हे वाचा - कसं शक्य आहे? ना प्रेग्नन्सीची लक्षणं, ना बेबी बम्प; रात्री पोटात वेदना झाल्या आणि सकाळी महिलेने अचानक दिला बाळाला जन्म द सनच्या रिपोर्टनुसार सॅम म्हणाला, मॅडीला वाटलं की मला चुकीचं बिल मिळालं असेल, मी तिला फसवतो आहे. बिल पाहून आम्हालाही हसू आलं. मला माझ्या फोनवर एक मेसेज आला की मला माझ्या ऑटो डिडेक्ट डेबिट कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. मला थोडं विचित्र वाटलं. किंमत वाढत आहेत हे मला माहिती होतं. पण इतकी याचा मी विचारही केला नव्हता. हे वाचा - धक्कादायक! लिफ्टमध्ये मालकिणीसोबत...; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद सुदैवाने कपलकडे इतके पैसे नव्हते, नाहीतर ते पैसे ऑटो डिडेक्ट झाले असते. अखेर शेल एनर्जीने हे तांत्रिक समस्येमुळे झाल्याचं सांगितलं. शेल एनर्जीचे प्रवक्त्याने सांगितलं, आमच्या अॅपमध्ये समस्या होती ज्यामुळे ग्राहकांच्या बिलाच्या संख्येवर परिणाम झाला. सॅम आणि मॅडीकडून आम्ही इतके पैसे वसूल करणार नाही. अशा समस्येचा सामना करणाऱ्या ग्राहकांच्या डायरेक्ट डेबिट पेमेंटवर प्रभाव पडणार नाही, हे आम्ही आश्वास्त करतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Uk, Viral, Viral news

    पुढील बातम्या