जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अवघ्या 10 सेकंदाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ; महिलेचा डान्स पाहून नजरच हटणार नाही

अवघ्या 10 सेकंदाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ; महिलेचा डान्स पाहून नजरच हटणार नाही

अवघ्या 10 सेकंदाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ; महिलेचा डान्स पाहून नजरच हटणार नाही

‘तारे जिन-गिन…’ हे पंजाबी गाणं याठिकाणी वाजत आहे. अचानक ही महिला फुल मूडमध्ये येते आणि देसी स्टाईलमध्ये डान्स करू लागते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 10 डिसेंबर : जे लोक लग्नात जवळचे नातेवाईक नसतात, म्हणजेच ज्यांना समारंभाच्या तयारीची जबाबदारी उचलावी लागत नाही, ते सहसा फक्त दोनच गोष्टींसाठी जास्त उत्सुक असतात. एक म्हणजे लग्नातील जेवण आणि दुसरं म्हणजे डीजेवर डान्स. आजच्या काळात लग्नसमारंभात डीजे असणं खूप गरजेचं झालं आहे. लोक डीजेवर अगदी मनमोकळेपणाने डान्स करतात आणि आनंद लुटतात. एका महिलेचा लग्नातील असाच डान्स व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसते. VIDEO: नवरदेवाने लग्नात नवरीला गिफ्ट दिलं गाढव; कारण ऐकून डोक्याला हात लावाल आजकाल एका लग्न समारंभाचा एक जुना व्हिडिओ इंस्टाग्रामवर पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला डान्स फ्लोरवर नाचताना दिसत आहे. इंस्टाग्राम अकाऊंट वेडबसवर शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- भारतीय लग्नांमध्ये असा डान्स असतो. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी असा नक्कीच असतो जो लग्नसोहळ्यात अशा पद्धतीने नाचतो की सगळ्यांच्याच लक्ष वेधून घेतो. मात्र या महिलेच्या डान्स नेटकऱ्यांचंही लक्ष वेधलं आहे.

जाहिरात

व्हिडिओमध्ये साडी नेसलेल्या महिलेला काही महिला डान्स फ्लोअरवर ओढताना दिसत आहेत. ‘तारे जिन-गिन…’ हे पंजाबी गाणं याठिकाणी वाजत आहे. अचानक ही महिला फुल मूडमध्ये येते आणि देसी स्टाईलमध्ये डान्स करू लागते. तिच्या आजूबाजूला उभे असलेले स्त्री-पुरुष तिला पाहून क्षणभर थांबतात आणि मग तेदेखील तिच्यासोबत नाचू लागतात. केसांना धरून जमिनीवर आपटत तरुणीची तिघींनी जबर मारहाण; घटनेचा Shocking Video मार्चमध्ये पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 69 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलं की त्याला या महिलेचा उत्साह आणि उर्जा आवडी. तर दुसरा म्हणाला की या महिलेच्या आत लपलेला मुलगा बाहेर आला. या महिलेच्या डान्सचं अनेकजण कौतुक करत आहेत. प्रत्येक व्यक्तीने या महिलेप्रमाणे खुलेपणानं आयुष्य जगावं, असंही एकाने कमेंट करत म्हटलं. एकंदरीतच व्हिडिओ नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात