जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: नवरदेवाने लग्नात नवरीला गिफ्ट दिलं गाढव; कारण ऐकून डोक्याला हात लावाल

VIDEO: नवरदेवाने लग्नात नवरीला गिफ्ट दिलं गाढव; कारण ऐकून डोक्याला हात लावाल

VIDEO: नवरदेवाने लग्नात नवरीला गिफ्ट दिलं गाढव; कारण ऐकून डोक्याला हात लावाल

अजलन शाह आपल्या नववधूला म्हणतो, ‘प्रश्न असा आहे की गाढव भेट म्हणून का दिलं जात आहे? तर याची २ उत्तरं आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

कराची 10 डिसेंबर : गाढव हा जगातील सर्वात मेहनती पण मूर्ख प्राणी मानला जातो. कोणाचा मुर्खपणा दाखवण्यासाठी त्याला अनेकदा गाढव म्हटलं जातं. पण एका व्यक्तीला गाढवाची एवढी ओढ लागली की, त्याने लग्नात नववधूला सरप्राईज गिफ्ट म्हणून गाढव भेट दिलं. सुरुवातीला ही विचित्र भेट पाहून नववधूला धक्का बसला, पण नंतर तिच्या नवऱ्याने तिला असं करण्यामागचं कारण सांगितल्यावर तिनेही गाढवाला मिठी मारली. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं Pre-wedding Shoot नको गं बाई! कपलसोबत धक्कादायक घडलं, तुम्ही करू नका अशी चूक पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अजलन शाह या प्राणीप्रेमीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर ही घटना शेअर केली आहे. यामध्ये त्याने आपल्या नववधूला गाढवाचे पिल्लू भेट दिल्याचे सांगितले. अशी आकर्षक भेटवस्तू देताना अजलन शाह आपल्या नववधूला म्हणतो, ‘प्रश्न असा आहे की गाढव भेट म्हणून का दिलं जात आहे? तर याची २ उत्तरं आहेत. पहिलं उत्तर आहे की तुला गाढवाचं पिल्लू खूप आवडतं आणि दुसरं उत्तर असं की हा जगातील सर्वात गोंडस आणि मेहनती प्राणी आहे.

जाहिरात

वराने असं म्हटल्यावर वधू वारिशा म्हणाली, ‘मी तुला फक्त गाढव राहू देणार नाही.’ हे ऐकताच समारंभात उपस्थित सर्व लोक हसू लागले. अजलन शाह व्हिडिओमध्ये म्हणतो की, ‘आम्ही गाढवाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून वेगळे केले नाही आणि तीही त्याच्यासोबत आली आहे. या दोघांना 30 हजार रुपयांना विकत घेतले होते. आता त्यांना कोणतीही मजुरी करावी लागणार नाही. ते शेतात आनंदाने जगतील. खूप खाणार, पिणार आणि आमच्याबरोबर खेळणार.’ बायको सोडून गेली म्हणून थेट लाऊड स्पिकर घेऊनच नवरा पोहोचला सासरच्या दारात; मग पुढे काय घडलं हे तुम्हीच वाचा या रंजक भेटवस्तूबद्दल अजलन शाहाने सांगितलं, की तो प्राणीप्रेमी आहे. त्यामुळे दुसरी कोणतीही मुलगी त्याच्यासोबत लग्नासाठी तयार होणं थोडं अवघड होतं. पण एकदा भेटीदरम्यान वारिसाने सांगितलं होतं की तिला गाढवाची पिल्लं खूप आवडतात. यामुळे दोघांचं ट्युनिंग जमलं. योगायोगाने त्याच्या आईलाही गाढवांची पिल्लं खूप आवडतात, त्यामुळे त्याने लग्नाच्या मंडपात गाढवाचं पिल्लू वारिसाला सरप्राईज गिफ्ट द्यायचं ठरवलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride , wedding
  • First Published :
जाहिरात
जाहिरात