नवी दिल्ली 09 डिसेंबर : अनेकदा आपल्याला मारामारी आणि भांडणं पाहायला मिळतात. कधी-कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही लोक एकमेकांशी भांडतात आणि नंतर त्यांच्या भांडणाचं स्वरूप मोठं होतं आणि ते एकमेकांना मारायलाही मागे पुढे पाहात नाहीत. अनेकवेळा लोक काहीतरी कारणावरुन रस्त्यावरच भांडू लागतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Viral Video: याला म्हणतात कर्माचं फळ, तरुणाने म्हशीला लाथ मारली आणि...
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही तरुणी चौकातच भांडताना दिसतात. हे पाहून आसपासचे लोकही हैराण होतात. तुम्ही मुलांचे दोन गट रस्त्याच्या मधोमध अनेकदा एकमेकांशी भांडताना पाहिले असतील, पण मुलींना असं भांडताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मुली एकमेकांशी अशा भांडताना दिसत आहेत जणू काही भयंकर वैर आहे. त्यापैकी एक स्वतःचा बचाव करत इतर तीन मुलींवर आलटून-पालटून हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करताना दिसते.
she took on 3 girls 😮😮 pic.twitter.com/Pd82QRkP1f
— EVERYDAY SCHOOL FIGHTS (@DAILYFIGHTS4U) December 6, 2022
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही मुली चौकाच्या मध्यभागी एकमेकांशी भांडू लागतात. एक मुलगा मध्यस्थी करायला येतो, पण एक मुलगी स्वतःची सुटका करून घेते आणि तीन मुलींवर हल्ला करण्यास सुरुवात करते. नंतर तिन्ही मुली तिला मारण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होत नाही. हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी रेकॉर्ड करून अपलोड केला होता, त्यानंतर तो व्हायरल झाला.
''वो स्त्री है कुछ भी कर सकती है'', बसमध्ये चढणाऱ्या तरुणीचा Video एकदा पाहाच
@DAILIFGHTS4U नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 44 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून लोक कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, 'ही खरी मांजराची लढाई आहे.' दुसऱ्या यूजरने कमेंट केली, 'भाऊ, त्या महिला काहीही करू शकतात'. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video, Shocking video viral