मराठी बातम्या /बातम्या /Viral /दुकानातील चोरी रोखण्यासाठी ग्राहक महिला चोरासोबत भिडली; भामट्याने हत्यार काढलं अन्.., Watch Video

दुकानातील चोरी रोखण्यासाठी ग्राहक महिला चोरासोबत भिडली; भामट्याने हत्यार काढलं अन्.., Watch Video

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक मास्क घातलेला एक माणूस दुकानात घुसला. दुकानदार महिलेनं त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार केला नाही कारण तिला वाटलं की  कोरोनामुळे त्याने मास्क घातलं आहे

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक मास्क घातलेला एक माणूस दुकानात घुसला. दुकानदार महिलेनं त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार केला नाही कारण तिला वाटलं की कोरोनामुळे त्याने मास्क घातलं आहे

रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक मास्क घातलेला एक माणूस दुकानात घुसला. दुकानदार महिलेनं त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार केला नाही कारण तिला वाटलं की कोरोनामुळे त्याने मास्क घातलं आहे

नवी दिल्ली 07 फेब्रुवारी : माणसाची ताकद त्याच्याकडे किती पैसा आहे, त्याची ओळख किती आहे किंवा त्याने किती बॉडी तयार केली आहे यातून दिसत नसते. तर जेव्हा तो कठीण प्रसंगी निर्भयपणे आव्हानाला सामोरे जातो आणि इतरांना मदत करण्यासही तयार असतो तेव्हा दिसते. नुकतंच इंग्लंडमधील एका महिलेनं असं धाडस दाखवलं की सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगू लागली. या महिलेने एका चोराला दुकान लुटण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral on Social Media) झाला आहे.

VIDEO- मोबाईल पाहताना मेट्रो ट्रॅकवर कोसळला तरुण, मदतीला धावला CISF जवान अखेर...

लॅड बायबल वेबसाइटनुसार, न्यूहॅम, पूर्व लंडनमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली. जयमिन राणा नावाच्या व्यक्तीचं याठिकाणी दुकान आहे. त्यानं सांगितलं की रात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याची आई दुकान सांभाळत असताना अचानक मास्क घातलेला एक माणूस दुकानात घुसला. महिलेनं त्या व्यक्तीबद्दल चुकीचा विचार केला नाही कारण तिला वाटलं की कोरोनामुळे त्याने मास्क घातलं आहे. मात्र अचानक त्याने एक बॅग काऊंटरवर ठेवली आणि यात सगळे पैसे टाकण्यास सांगितलं.

" isDesktop="true" id="665783" >

दुकानात असलेली एक महिला ग्राहक हे सर्व पाहात होती. तिने लगेचच या चोराला दुकान लुटू न देण्याचा निर्णय घेतला (Woman Attacks on Robber). तिने वारंवार चोराला निघून जाण्यास सांगितलं. यानंतर चोराने एक हत्यार काढल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसलं. त्याने दुकानदाराला धमकवायला सुरुवात केली, इतक्यात महिला ग्राहकाने चोरावर हल्ला केला (Woman Customer Fight with Robber to Protect Shop). तिने चोरावर हल्ला करण्यास सुरुवात करताच चोरानेही तिला जोरात धक्का देत जमिनीवर पाडलं. इतक्यात दुकानदाराने लगेचच पॅनिक अलार्मचं बटण दाबलं. यानंतर चोर तिथून निघून गेला.

Video :दुर्दैवी! आभाळ समजून इमारतीच्या काचेला पक्ष्यांच्या थव्याची धडक,34 मृत्यू

महिला ग्राहकाच्या निर्भिडपणामुळे दुकानातील एकही सामान चोरी झालं नाही. मात्र, महिलेला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी डेली मेलसोबत बोलताना सांगितलं की 20 जानेवारीला त्यांना दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाली, यानंतर ते याठिकाणी पोहोचले. सोशल मीडियावर महिलेच्या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की आजच्या काळात अशा नागरिकांची गरज आहे, जे इतरांच्या मदतीसाठी धावून येतील. लोकांनी महिलेला हिरो म्हटलं आहे.

First published:

Tags: Robbery, Shocking video viral