सुरत, 5 फेब्रुवारी : इमारतीच्या सजावटीसाठी लोक आरसे लावतात. मात्र हा आरसा पक्ष्यांसाठी इतका धोकादायक असू शकतो की, याचा आपण विचारही करू शकत नाही. गुजरातच्या (Gujrat News) सुरतमध्ये इमारतीच्या आरशाला धडक दिल्यामुळे 34 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीला लावलेल्या आरशात आकाशाचं प्रतिबिंब दिसत होतं. अशात काचेचा आकाश समजून जलद गतीने येणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याने धडक दिली. पक्षांची गती जास्त होती. इमारतीच्या काचेला धडक दिल्यानंतर सर्व पक्षी खाली पडले आणि या दुर्घटनेत 34 पक्ष्यांचा मृत्यू झाला.
सूरत:
— Janak Dave (@dave_janak) February 4, 2022
बिल्डिंग के शीशे से टकराने से 34 पक्षियों की मौत?
जिला बैंक की बिल्डिग के CCTV में एक साथ 34 पक्षी ऊपर से गिरते देखे।
बताया जा रहा है की बिल्डिंग पर शीशे लगे थे,जिस में आसमान का रिफ्लेक्शन दिख रहा था।आसमान समझकर शीशे से तेज रफ्तार तो नही टकराये पक्षी!@kirteshpatel305 pic.twitter.com/0UAVP2l5VR
या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात आपल्याला अनेक पक्षी जमिनीवर पडलेले दिसत आहेत.