Home /News /viral /

Shocking! महिलेनं फेक अकाऊंट बनवून बहिणीलाच ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; 10 वर्षांनी फुटलं बिंग

Shocking! महिलेनं फेक अकाऊंट बनवून बहिणीलाच ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; 10 वर्षांनी फुटलं बिंग

एका महिलेनं आपलं फेक प्रोफाईल बनवलं, मात्र तिचा हा कारनामा दहा वर्षांनंतर समोर आला. हैराण करणारी बाब म्हणजे या फेक प्रोफाईलच्या माध्यमातून ही तरुणी आपल्याच बहिणीला फसवत होती

    नवी दिल्ली 05 जानेवारी : सोशल मीडियाचा (Social Media) प्रसार दिवसेंदिवस वाढत असतानाच अनेक लोक याचा चुकीचा वापरही करत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे काही लोक सोशल मीडियावर फेक प्रोफाईल (Fake Profile on Social Media) बनवतात आणि इतर लोकांसोबत बोलू लागतात. अनेकदा अशा फेक लोकांचं खोटं पकडलंही जातं. मात्र, काही प्रकरणांमध्ये उलट घडतं. लंडनमधून नुकतीच एक अशीच हैराण करणारी घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं आपलं फेक प्रोफाईल बनवलं, मात्र तिचा हा कारनाम दहा वर्षांनंतर समोर आला. हैराण करणारी बाब म्हणजे या फेक प्रोफाईलच्या माध्यमातून ही तरुणी आपल्याच बहिणीला फसवत होती (Woman Create Fake Profile to Catfish Cousin). पाहुण्यांनी नवरीला हवेत फेकलं, पण...; काळजाचा ठोका चुकवणारा Wedding Video लंडनमध्ये राहणारी 42 वर्षीय महिला किरत अस्सी शीख समुदायातील आहे आणि आधी रेडिओ जॉकी म्हणून काम करायची. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, किरतसोबत असं काही घडलं जे जाणून सगळेच हैराण झाले. किरतने सांगितलं की साल 2009 मध्ये बॉबी नावाचा शीख समुदायातीलच एक व्यक्ती तिच्यासोबत फेसबुकवर जोडला गेला. किरतला नेहमी वाटत असे की बॉबी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, मात्र जेव्हा तिला संशय आला तेव्हा तिने एक प्रायव्हेट गुप्तहेर नेमून सत्य शोधलं. जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा या महिलेला धक्काच बसला. कारण प्रत्यक्षात बॉबी नावाचा कोणी व्यक्ती नव्हताच. तर किरतची चुलत बहीण सिमरन भोगल हीच 2009 पासून किरतसोबत फेसबुकवर जोडली गेली होती आणि बॉबी नावाने किरतसोबत बोलत, तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. इतकंच नाही तर सिमरन किरतच बॉबीसोबत ऑनलाईन बोलणं करून देण्यासाठीही तिची मदत करत असे. सिमरनने मस्करीतच बॉबी बनून किरतसोबत प्रेमाचं नाटक केलं आणि तिच्यासोबत लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप कायम ठेवलं. एका लग्नाची भलतीच गोष्ट! ना पुरुष ना स्त्री, तिने केले गुलाबी रंगाशी लग्न; कारण. रिपोर्टनुसार सिमरनने तब्बल 50 फेक प्रोफाईल बनवले होते, जेणेकरून ती किरतला हे पटवून देऊ शकेल की बॉबी खरंच कोणीतरी व्यक्ती आहे. सत्य समोर येताच किरतने आपल्या बहिणीविरोधात तक्रार दाखल केली मात्र हे प्रकरण कोर्टाच्या बाहेरच सोडवण्यात आलं. किरतने आता आपल्या बहिणीच्या विरोधात कॅटफिशिंगता आरोप केला आहे. कॅट फिशिंगचा (Catfishing) अर्थ आहे, आपलं सत्य लपवून किंवा नकली माणसाच्या नावाने एखाद्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणं आणि रिलेशनशिप ठेवणं. किरतने सांगितलं की ही चेष्टेची बाब नसून या गोष्टीचा तिच्या मानसिक आरोग्यावर खूपच वाईट परिणाम झाला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Fake, Social media, Viral news

    पुढील बातम्या