मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाहुण्यांनी नवरीला हवेत फेकलं, पण...; काळजाचा ठोका चुकवणारा Wedding Video

पाहुण्यांनी नवरीला हवेत फेकलं, पण...; काळजाचा ठोका चुकवणारा Wedding Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Video of Bride) तुम्ही पाहू शकता, की एका लग्नसमारंभानंतर लग्नात आलेले पाहुणे नवरीला हवेत फेकू लागतात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Video of Bride) तुम्ही पाहू शकता, की एका लग्नसमारंभानंतर लग्नात आलेले पाहुणे नवरीला हवेत फेकू लागतात

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Video of Bride) तुम्ही पाहू शकता, की एका लग्नसमारंभानंतर लग्नात आलेले पाहुणे नवरीला हवेत फेकू लागतात

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 जानेवारी : सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील निरनिराळे व्हिडिओ (Viral Wedding Videos) अनेकदा व्हायरल होत असतात. लग्न झाल्यावर नातेवाईक नवरी आणि नवरदेवाला आशिर्वाद देण्यासाठी स्टेजवर येतात. नवरी आणि नवरदेवाचे मित्र त्यांना उचलून घेतात आणि तेव्हाच वरमाळा एकमेकांना घातली जाते. मात्र कधीकधी लग्नातील ही मस्ती भलतीच महागातही पडू शकते. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं की लग्नात आलेल्या पाहुण्यांनी नवरीसोबत अशी मस्करी केली जी पाहून क्षणभरासाठी तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

स्टंट करत असतानाच अचानक कारचे 2 तुकडे झाले अन्...; Shocking Video

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Video of Bride) तुम्ही पाहू शकता, की एका लग्नसमारंभानंतर लग्नात आलेले पाहुणे नवरीला हवेत फेकू लागतात. यादरम्यान हवेतून नवरीला झेलणाऱ्या लोकांचा बॅलन्स बिघडतो आणि नवरीलाही अचानक स्वतःला सांभाळणं अशक्य होतं. इतक्यात नवरदेव सतर्कता दाखवत नवरीला पकडतो. जमिनीवर कोसळत असताना नवरीचे हावभाव पाहून समजतं की ती भरपूर घाबरलेली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, लग्नात अशा प्रकारची मस्ती अनेकदा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हे सगळं करणं टाळा. तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हवेत जाताच नवरी प्रचंड घाबरली होती, हे तिचा चेहरा पाहूनच समजतं. आणखी एकाने लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये.

विनामास्क खरेदीसाठी पोहोचलेल्या महिलेचा पराक्रम; स्वतःचे कपडे काढले अन्.., VIDEO

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ proposalspage नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये अनेक हॅश्टॅग देण्यात आले आहेत. एकंदरीतच हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video