दिल्ली, 27 जानेवारी : मासा आणि तोसुद्धा शुद्ध शाकाहारी? मथळा वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कारण मासा म्हणजे म्हणजे नॉनव्हेजच... हो अगदी बरोबर आहे. पण सध्या सोशल मीडियावर व्हेजिटेरिअन माशाची चर्चा होते आहे. व्हेजिटेरिअन फिशचा
(Vegetarian Fish Fry) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल.
शाकाहारी लोक मांसाहाराऐवजी पर्यायी पदार्थ खातात. म्हणजे मांसाहारातून जे पोषक घटक मिळतात ते इतर शाकाहारी पदार्थांतून ते मिळवतात. पण विचार करा जर मासाच शाकाहारी असेल तर... शाकाहारी खाताना तुम्हाला मांसाहारीची चव चाखायला मिळाली तर...
(Weird Food Experiment). एका फूड विक्रेत्याने ते करून दाखवलं आहे
(Vendor is making vegetarian fish).
एका फूड स्टॉलवर चक्क शाकाहारी मासे खायला मिळत आहेत. दिल्लीमधील या विक्रेत्याने आपण व्हेजिटेरिअन लोकांसाठी व्हेजिटेरिअन मासे बनवत असल्याचा दावा केला आहे.
हे वाचा - खवय्य्यांसाठी सुवर्णसंधी! हा चाट खाण्यासाठी मिळतायेत पैसे; कुठे आहे ही ऑफर पाहा
foodie_incarnate नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. फूड ब्लॉगर अमर सिरोहीने या फूड स्टॉलबाबत माहिती दिली आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सोयाबीनसोबत आलं-लसूण पेस्ट मिसळली जाते. त्याला माशाचा आकार जिला जातो. त्यानंतर हे मॉकफिश कॉर्नफ्लोरमध्ये काही मसाले टाकून त्यात मॅरिनेट केलं जातं. त्यानंतर त्यावर कॉर्न आणि ब्रेड क्रम्ब्स लावून ते डीप फ्राय केलं जातं. शेवटी जो पदार्थ तयार होतो अगदी तळलेल्या माशाप्रमाणेच दिसतो. या डिशची किंमत 250 रुपये आहे.
हे वाचा - ऑनलाईन ऑर्डर केलेला चिकन रोल चावला आणि...; घास तोंडाबाहेर काढताच हादरली महिला
व्हिडीओ पाहताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींना हा शुद्ध शाकाहारी मासा आवडला आहे, तर काहींना मात्र हे बिलकुल रुचलेलं नाही. तुम्हाला हा व्हेजिटेरिअन फिश कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.