क्वालालांपूर, 27 जानेवारी : काही तरी वेगळं खायचं आहे किंवा भूक लागली पण घरी काही बनवायचा कंटाळा आला आहे. बाहेरचं काहीतरी खावंसं वाटतं आहे पण घराबाहेर जाऊनही खायचा कंटाळा. मग अशावेळी आपण ऑनलाईन फूड ऑर्डर
(Online Food Delivery) करतो. अगदी एका क्लिवकर काही वेळातच आपल्याला हवे ते पदार्थ घरपोच मिळतात. पण ऑनलाईन ऑर्डर मग ती वस्तू असो किंवा पदार्थ कधीतरी घोळ हा होतोच. तुम्हालाही कदाचित याचा अनुभव आला असावा. मलेशियातील एका महिलेने आपला असाच धक्कादायक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
क्वालालांपूरच्या बंगसारमधीलमधील एरिआना नावाची महिला. तिने एका रेस्टॉरंटमधून ऑनलाईन फूड ऑर्डर केलं. तिने दाल-रोटी मागवली होती. तिने ऑर्डर केले पदार्थ तिच्या घरी पोहोचले. तिने डाळ एका भांड्यात काढली तेव्हा तिला त्यात काहीतरी काळं विचित्र असल्यासारखं दिसलं, तिने चमच्याने ते काढून पाहिलं आणि तिला धक्काच बसला
(Maggots In Dal Curry).
आता डाळ म्हटली की त्यात मोहरी-जिऱ्याचा तडका हा असतो. काहीवेळा हा तडका पाहून आपलाही गोंधळ उडतो. डाळीत हे काय काळं पडलं आहे, असं आपल्याला वाटतं आणि आपण ते नीट निरखून पाहिल्यावर ती मोहरी किंवा जिरं आहे हे आपल्याला समजतं. पण महिलेला डाळीत जे दिसलं ते यापेक्षा थोडं विचित्र होतं.
हे वाचा - ऑनलाईन ऑर्डर केलेला चिकन रोल चावला आणि...; घास तोंडाबाहेर काढताच हादरली महिला
तिने खात्री करण्यासाठी डाळ चमच्यात घेऊन पाहिली तर ते मोहरी-जिरं नव्हे तर चक्क अळ्या होत्या. त्या डाळीत मोहरी-जिराचा तडक्यासोबतच तिला अळ्या सापडल्या
(Maggots Served In Dal Curry).

एरिआनाने एका फूड अॅपवरून हे खाणं मागवलं होतं. तिने सुरुवातीला अॅप आणि नंतर थेट फूड चेन कंपनीकडेच याची तक्रार केली. रेस्टॉरंटमध्ये स्वतः जाऊनही तिने याची तक्रार दिली. याबाबत रेस्टॉरंट मॅनेजरने माफी मागितली आहे. पहिल्यांदाच रेस्टॉरंटकडून असा हलगर्जीपणा झाला आहे. यापुढे असं कधीच होणार नाही, असं आश्वासनही दिलं आहे. तिला रिफंडही देण्यात आलं.
हे वाचा - कधी खाल्ला आहे का शुद्ध शाकाहारी मासा? Vegetarian fish चा Video एकदा पाहाच
लोकांना जागरूक करण्यासाठी एरिआनाने या डाळीचे आणि त्यात सापडलेल्या अळ्यांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो व्हायरल झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.