मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिलेनं हातामध्ये पकडला भलामोठा किंग कोब्रा; सापानं केलेल्या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा VIDEO

महिलेनं हातामध्ये पकडला भलामोठा किंग कोब्रा; सापानं केलेल्या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा VIDEO

एक महिला हातात किंग कोब्रा साप (King Cobra Video) पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

एक महिला हातात किंग कोब्रा साप (King Cobra Video) पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

एक महिला हातात किंग कोब्रा साप (King Cobra Video) पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

नवी दिल्ली 30 जुलै: सापाचं (Snake) नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. अशात तुमचा सामना एखाद्या सापाशी झाला तर? सहाजिकच तुमची घाबरगुंडी उडेल. एकीकडे काही लोकांना सापाचं नाव ऐकूनही भीती वाटते, तर दुसरीकडे काही लोकं मात्र सापाला अजिबातही घाबरत नाहीत. सध्या इंटरनेटवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक महिला हातात किंग कोब्रा साप (King Cobra Video) पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

फोटोशूट करतानाच नवरीनं धक्का देत नवरदेवाला पाण्यात ढकललं अन्...; पाहा VIDEO

इंटरनेटच्या दुनियेत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक महिला हातामध्ये भलामोठा किंग कोब्रा साप पकडत असल्याचं दिसतं. सुरुवातीला ही महिला सापाला पकडण्यासाठी काठीचा वापर करते, मात्र नंतर ती हातातली काठी फेकून देते. यानंतर ही महिला आपल्या हातानंच साप पकडण्याचा निर्णय घेते. ती सापाला आपल्या हातात पकडते तेव्हा मागे उभा असणारे लोक तिला रस्ता देण्यासाठी बाहेर धाव घेतात.

" isDesktop="true" id="585953" >

महिला हातात साप घेऊन रुममधून बाहेर पडते आणि यानंतर रस्त्याच्या कडेला जाऊन ती या सापाला सोडून देते. मात्र, साप घराकडे जाण्याची प्रयत्न करू लागताच ती पुन्हा एकदा सापाला पकडू लागते. मात्र, यामुळे साप तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या हल्ल्यापासून ती स्वतःचा बचाव करते. यानंतर ही महिला सापाला पकडून एका बॅगमध्ये टाकते. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. Mr Master नावाच्या यूट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

क्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप; रेल्वे स्टेशनवरील थरारक घटनेचा VIDEO

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत दीड लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, 19 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. महिलेची साप पकडण्याची ही कला पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. तर, अनेकांनी साप पकडण्याची ही पद्धत धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: King cobra, Poisonous cobra, Shocking video viral, Snake