नवी दिल्ली 30 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) मागील काही दिवसांपासून लग्नसमारंभातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतात. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लग्नातील व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर, काही इमोशनल तर काही मात्र धक्कादायक असतात. सध्या लग्नातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये नवरी नवरदेवासोबत (Bride and Groom Video) अशी गंमत करते की ते पाहून नवरदेवही थक्क होतो. भलतीच हौस! लग्नात नवरीबाईनं घातला 100 किलोचा लेहंगा; VIDEO पाहून चक्रावले नेटकरी व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरदेव आणि नवरीचं फोटोशूट (Wedding Photo-shoot) सुरू आहे. या फोटोशूटसाठी पाण्यात एका छोट्या पुलावरच छोटं स्टेज बनवण्यात आलं आहे. व्हाइट गाऊनमध्ये उभा असलेली नवरी आपल्या नवरदेवासोबत फोटोसाठी पोज देत आहे. मागे उभा असलेला फोटोग्राफर आणि त्याची टीम फोटो क्लिक करण्यासाठी तयार आहेत. मात्र, इतक्यात फोटोग्राफर नवरी-नवरदेवाच्या जवळ येऊन त्यांना पोज शिकवू लागतो. मात्र, फोटोग्राफर नवरदेवाच्या जवळ जात त्याला पोज शिकवू लागताच नवरी त्या दोघांनाही धक्का देऊन पाण्यात पाडते.
जिवाची पर्वा न करता तिघांना वाचवण्याासाठी घेतली पुराच्या पाण्यात उडी अन्…. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. वेडिंग फोटोशूटचा हा व्हिडिओ पाहून नेचकरी पोट धरून हसत आहेत.