नवी दिल्ली 26 सप्टेंबर : साप चावल्यावर अनेकांचा जीव जातो. हे माहिती असूनही एका व्यक्तीनं जिवंत साप गिळला (Man Swallowed Snake). ऐकायला विचित्र (Weird News) वाटत असलं तरीही ही घटना खरी आहे. मात्र, हा स्टंट त्या व्यक्तीलाचा महागात पडला. हे कृत्य त्या व्यक्तीला अतिशय महागात पडलं आणि त्याला आपला जीव गमवावा लागला (Man Died After Swallowed Live Snake). रशियाच्या (Russia) 55 वर्षीय शेतमजूराचा एक व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती जिवंत साप गिळताना दिसतो. पहिल्या नजरेत जुळलं प्रेम; लग्नानंतर पत्नीचं गुपित समोर आल्यानंतर पती हादरला! Daily Star च्या वृत्तानुसार, या व्यक्तीनं आधी दोन वेळा सापाला गिळण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्यांदा प्रयत्न करत असताना साप त्याच्या जीभेला चावला. यानंतरही हा व्यक्ती थांबला नाही आणि साप त्याच्या गळ्यालाही चावला. यानंतर काहीच तासात या व्यक्तीची प्रकृती बिघडू लागली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, की सापानं चावा घेतल्यानं या व्यक्तीला अॅलर्जी झाली. आताच्या आता विमान लॅण्ड करा, मला फोनवर बोलायचंय; प्रवाशाची स्टाफला मारहाण या व्यक्तीच्या जीभेवर आणि गळ्यात प्रचंड सूज होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या व्यक्तीला एनाफिलेक्टिर शॉक लागला. साप चावल्यानं या व्यक्तीची जीभ इतकी सूजली होती की त्याच्या तोंडातही बसत नव्हती. याच कारणामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात स्थानिक लोकांमध्ये साप गिळण्याची प्रथा आहे. इथे टरबूजाच्या शेतात स्टेप वायपर आढळून येतात. हे साप जास्त विषारी नसतात. मात्र, माणसांना नुकसान पोहोचवू शकतात. या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनानं लोकांना साप न गिळण्याचं आवाहन केलं. यामुळे जीव जाऊ शकतो, असंही त्यांना सांगण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.