नवी दिल्ली 22 ऑगस्ट : दररोज इंटरनेटवर नवनवे व्हिडिओ अपलोड झाल्याचं आणि व्हायरल (Video Viral on Social Media) झाल्याचं पाहायला मिळतं. काही लोक आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तर काही टॅलेंटमुळे सोशल मीडियावर अवघ्या काही तासातच व्हायरल होतात. लखनऊमधील (Lucknow) व्हायरल गर्ल प्रियदर्शिनी (Viral Girl Priyadarshini) ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. अशात आता आणखी एक महिला चर्चेत आली आहे. साडीमध्ये दिसणाऱ्या या महिलेनं चौकातच एका व्यक्तीची धुलाई केली आहे. (Trending Video) OMG! व्यक्तीनं हवेत एका लहान काठीवर केला जबरदस्त स्टंट; VIDEO पाहून व्हाल चकीत सोशल मीडिया साईट ट्विटरवर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ लखनऊच्या टेढी पोलीस चौकात शूट केला गेला आहे. यात एक टेम्पो ड्रायव्हर (Tempo Driver) दिसत आहे. हा व्यक्ती टेम्पोमधून उतरून ट्राफिक पोलिसांकडे (Traffic Police) दोन युवकांची तक्रार करत आहे. त्यांच्यात टेम्पोच्या भाड्यावरुन वाद सुरू आहे. इतक्यात केशरी रंगाची साडी घातलेली एक महिला तिथे पोहोचते.
नवरीनं लग्नाच्या स्टेजवरच नवरदेवाला रडवलं; व्हायरल होतोय Wedding Video ही महिलादेखील त्या दोन युवकांसोबतच होती. हे प्रकरण वाढत असल्याचं पाहून तिनं चौकातच आपल्या पायातील चप्पल काढली आणि ती टेम्पो चालकाला मारहाण करू लागली. याप्रकरणी आतापर्यंत कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. महिला या व्यक्तीला मारत असल्याचं पाहून आसपासचे पोलीस कर्मचारी बचावासाठी पुढे आले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.