नवी दिल्ली 22 ऑगस्ट : काही नवरीबाई आपल्या नवरदेवाला स्पेशल फील करून देण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या अशाच एका नवरी आणि नवरदेवाचा व्हिडिओ (Bride Groom Video) सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीदेखील इमोशनल (Emotional Video) व्हाल. नवरीबाईच्या लग्नात अनेक वेगवेगळ्या इच्छा असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र, हा व्हिडिओ (Wedding Video) पाहून समजतं, की नवरदेवालाही अशाच स्पेशल ट्रीटमेंटची अपेक्षा असते. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये आढळलं भलतंच काही; पाहूनच चक्रावली महिला सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या वेडिंग व्हिडिओला मोठी पसंती मिळते. काही व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेवाची बॉन्डिंग पाहण्यासारखी असते. तर, काही व्हिडिओ इतके विनोदी असतात, की ते पाहूनच नेटकरी पोट धरून हसू लागतात. सध्या व्हायरल होत असलेल्या इमोशनल व्हिडिओमध्ये नवरी आपल्या नवरदेवासाठी स्टेजवर डान्स करताना दिसते. तिला पाहून सगळेच भावुक होतात.
नवरीला पाहून नवरदेव नाही तर दिरच झाले फिदा; पळत जाऊन मारली मिठी, VIDEO VIRAL ही नवरी आपल्या नवरदेवाला स्पेशल फील करून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. डान्स परफॉर्मन्सनंतर ती आपल्या नवरदेवाला प्रपोज करण्यासाठी स्टेजवरच आल्या गुडघ्यावर बसते. हे पाहून नवरदेवही आपले इमोशन्स कंट्रोल करू शकत नाही आणि सर्वांसमोर त्याच्या डोळ्यात पाणी येतं. यानंतर तो नवरीला मिठी मारतो. स्टेजवर उपस्थित असलेले सर्व पाहुणे नवरीच्या डान्सवर टाळ्या वाजवून तिचा उत्साह वाढवत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी नवरी आणि नवरदेवाच्या बॉन्डिंगचं कौतुक केलं आहे.