• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • महिलेचे केस कापताना केलेली ती चूक सलूनला भोवली; द्यावी लागली 2 कोटीची नुकसान भरपाई

महिलेचे केस कापताना केलेली ती चूक सलूनला भोवली; द्यावी लागली 2 कोटीची नुकसान भरपाई

या चुकीमुळे महिलेला जवळजवळ आपले संपूर्ण केस गमवावे लागले होते. तक्रार करणारी महिला हेअर प्रोडक्टसाठीची मॉडेल होती

 • Share this:
  नवी दिल्ली 24 सप्टेंबर : राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (National Consumer Disputes Redressal Commission) एका महिलेचे हॉटेल आयटीसी मौर्य (Hotel ITC Maurya) येथील सलूनमध्ये 2018 मध्ये कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल आणि तिला योग्य वागणूक न दिल्याबद्दल तिला 2 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे (Woman Awarded Rs 2 Crore Compensation For Wrong Haircut). या चुकीमुळे महिलेला जवळजवळ आपले संपूर्ण केस गमवावे लागले होते. तक्रार करणारी महिला हेअर प्रोडक्टसाठीची मॉडेल होती. या प्रकरणावर आर के अग्रवाल आणि एस एम कानटीकार यांनी निर्णय सुनावला आहे. त्यांनी म्हटलं, की महिला आपल्या केसांबाबत अतिशय संवेदनशील असतात आणि आपले केस चांगले राहावे, यासाठी त्या अनेक प्रयत्न करत असतात. त्यामुळे, या महिलेसाठीही तिचे केस फार महत्त्वाचे होते. महिला आपल्या केसांबाबत भावनिकही असतात. तक्रारदार महिला ही आपल्या लांब केसांमुळेच हेअर प्रोडक्टसाठी मॉडेलिंग करायची तिनं VLCC आणि पॅन्टीनसारख्या प्रोडक्टसाठीही मॉडेलिंग केलं आहे. मात्र, सलूनच्या एका चुकीमुळे तिला आपले लांब केस कापावे लागले आणि यामुळे तिचं बरंच नुकसान झालं आहे. यासोबत भविष्यात टॉपची मॉडेल बनण्याचं तिचं स्वप्नही भंगलं असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. कपड्यांमुळे तरुणीची भलतीच फजिती; व्हिडिओ पाहताच मदतीसाठी ऑफिस सोडून पळत आला BF 12 एप्रिल 2018 रोजी या महिलेनं हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनला भेट दिली. तिला रेग्यूलर हेअरकट करायचा होता. तिनं आपल्या नेहमीच्या स्टायलिशनंच माझा हेअरकट करावा असंही सांगितलं. मात्र, त्यावेळी तो तिथे उपस्थित नसल्यानं स्टाफमधील दुसऱ्या स्टायलिशनं महिलेचा हेअरकट केला. आपल्या तक्रारीत तिनं म्हटलं, की मी हेअरस्टायलिशला सांगितलं, की खालच्या बाजूनं केवळ 4 इंचच सरळ केस काप. मात्र, जेव्हा मी आरशात पाहिलं तेव्हा मला धक्का बसला कारण त्यानं माझ्या डोक्यावर चार इंचापेक्षाही कमी केस ठेवले होते. डोळे तपासायला गेलेली महिला निघाली भलत्याच आजाराची रुग्ण, रिपोर्ट पाहून झाली शॉक तक्रारदार महिलेनं पुढे सांगितलं, की सलूनच्या कर्मचाऱ्यांनी तिला ट्रिटमेंटची ऑफर दिली. मात्र, हे संशयास्पद होतं आणि यामुळे तिच्या केसांचं नुकसान झालं. केसांच्या ट्रीटमेंटमुळे तिच्या टाळूवर प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि डोक्यात खाज सुटली होती. या केमिकल वापरून केलेल्या ट्रीटमेंटमुळे तिच्या टाळूला कायमची दुखापत झाली. याच कारणामुळे महिलेला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं. तिची नोकरीही गेली. महिलेनं सांगितलं, की लांब केसांची सवय असताना या स्टाफनं माझ्या डोक्यावर चार इंचापेक्षाही कमी केस ठेवले होते. यामुळे मी मानसिकरित्या खचले होते. आरशात पाहाणं सोडून दिलं होतं. महिचा आत्मविश्वास या काळात पूर्णपणे ढासळला होता. तिने मीटिंग आणि आपल्या कामांकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केलं. यामुळे तिला याचा मोठा तोटा सहन करावा लागल्याचं कोर्टानं म्हटलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: