Home /News /viral /

डोळ्यांची तपासणी करण्यासाठी गेलेली महिला निघाली भलत्याच आजाराची रुग्ण, रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

डोळ्यांची तपासणी करण्यासाठी गेलेली महिला निघाली भलत्याच आजाराची रुग्ण, रिपोर्ट पाहून सरकली पायाखालची जमीन

बऱ्याच दिवसांपासून स्पष्ट दिसत नसल्यानं नोव्हेंबर 2018 मध्ये त्या ऑप्टिशियंसकडे गेल्या. याआधी बरेच दिवस त्यांना चष्माही वापरला होता. मात्र, काहीही फरक पडला नाही.

    लंडन 24 सप्टेंबर : एक महिला आपल्या डोळ्यांचं रुटीन चेकअप (Routine eye-test) करण्यासाठी गेली होती. अनेक दिवसांपासून तिला अस्पष्ट दिसत होतं. मात्र, चेकअपमध्ये तिला एक धक्कादायक बाब समजली. या गोष्टीमुळे तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं. महिलेला समजलं, की तिला जीवघेणा ब्रेन ट्यूमर (Brain tumor) आहे. ब्रिटनमधील (Britain) साराह कार्डवेल ही 46 वर्षांची आहे. दोन मुलांची आई असलेल्या त्या चॅरिटी ब्रेन ट्यूमर रिसर्चसोबत काम करतात. नुकतंच त्यांनी नॅशनल आय हेल्श अवेरनेसदरम्यान आपली कथा सांगितली. बऱ्याच दिवसांपासून स्पष्ट दिसत नसल्यानं नोव्हेंबर 2018 मध्ये त्या ऑप्टिशियंसकडे (Optician) गेल्या. याआधी बरेच दिवस त्यांना चष्माही वापरला होता. मात्र, काहीही फरक पडला नाही. ऑप्टिशियंसनं महिलेच्या अनेक टेस्ट केल्या मात्र ग्लास बदलूनही तिला स्पष्ट दिसत नव्हतं. यानंतर तिला नेत्र रोग रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. क्या बात है! सोशल मीडियाच्या माध्यमातून 'ही' कंपनी कुत्र्यांना बनवते सुपर मॉडेल तिथे डोळ्यांच्या स्पेशलिस्टनं महिलेच्या डोळ्यांच्या मागील बाजूचे फोटो घेतले आणि कलर ब्लाइंडनेस टेस्ट केली. दोन मुलांची आई असलेल्या साराहनं सांगितलं, की यानंतर आय स्पेशलिस्टनं मला अनेक सवाल केले. तुम्ही लवकर थकता का आणि तुम्हाला कधी काही अजब लक्षणं दिसली का, असं ते विचारू लागले. साराहनं सांगितलं, की मला अॅनिमियासाठी आयरनच्या गोळ्या दिल्या गेल्या होत्या आणि मला चक्करही यायची. प्रचंड डोकेदुखी होत असल्यानं मी डॉक्टरकडे गेले होते. मात्र, तेव्हा मला वाटलं होतं, की खूप जास्त काम केल्यानं असं होत आहे. यानंतर साराहला MRI स्कॅन करण्यास सांगितलं गेलं. या स्कॅनमध्ये तिच्या मेंदूत ट्यूमर दिसून आला. दुसऱ्या दिवशी तिला आणखी एक MRI करण्यासाठी सांगितलं गेलं. काहीच दिवसात ती एका न्यूरोसर्जनजवळ बसलेली होती. तिला सांगितलं गेलं की तिला ब्रेन ट्यूमर असून याच कारणामुळे ऑप्टिक नर्वसंबंधीच्या समस्या येत आहेत. सर्जननं साराहला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. हे ऐकूनच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिनं रडतच तिच्या मुलांना सांगितलं, की काही दिवस ती त्यांच्यासोबत न राहता रुग्णालयात राहणार आहे. VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण डॉक्टरांनी पाच तासाची ब्रेन सर्जरी करून ट्यूमर काढून टाकलं. 22 डिसेंबरल 2018 ला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र, अडचणी अजूनही कमी झालेल्या नव्हत्या. साराहनं सांगितलं, की फेब्रुवारीच्या MRI स्कॅनमध्ये सगळं ठीक दिसत होतं. मात्र, जूनमध्ये MRI स्कॅनमध्ये पुन्हा एकदा ट्यूमर दिसून आला. माझ्या डोळ्यांनाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी यासाठी पुन्हा एकदा सर्जरी केली. साराहनं पुढे सांगितलं, की यावेळी रुग्णालयातून मला सुट्टी मिळाली मात्र सेरेब्रोस्पायनल फल्यूड लिक आणि सूज होती. मला पुन्हा एकदा रुग्णालयात जावं लागलं. यावेळी दोन सर्जरी करून लिक होणारं फल्यूड बंद केलं गेलं. हा खूपच वाईट अनुभन होता. साराह आता वर्षातून एकदा MRI स्कॅन करून घेते आणि सध्या तिची स्थिती ठीक आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Shocking news, Viral news

    पुढील बातम्या