नवी दिल्ली 24 सप्टेंबर : अनेकदा माणूस अशा काही अडणचींमध्ये अडकतो जे पाहून कोणालाही हसू येईल. मोठ्या समस्या माणसाला हैराण करून सोडतात. मात्र, कधी कधी अगदी लहान समस्याही पूर्णतः हैराण करून सोडतात. सध्या अशाच परिस्थितीत अडकलेली एक मुलगी सोशल मीडियावर
(Social Media) चांगलीच चर्चेत आली आहे. ही तरुणी स्वतःसाठी नवा ड्रेस
(New Dress) घेऊन आली होती. मात्र, हा ड्रेस ट्राय करताना आपल्याला एवढा त्रास होईल, याची तिनं कल्पनाही केली नव्हती.
लंडनमध्ये राहणाऱ्या या तरुणीचं टिकटॉकवर @slurricanemandy नावानं अकाऊंट आहे. तिनं आपल्यासाठी एक नवा ड्रेस घेतला होता. जेव्हा ती हा ड्रेस ट्राय करत होती, तेव्हा घरात कोणीच नव्हतं. तिनं जेव्हा हा ड्रेस घातला, तेव्हा तिला तो थोडा टाईट वाटला. मात्र, पुढे काय होणार आहे याची तिनं कल्पनाही केली नव्हती. ड्रेस काढताना ही तरुणी कपड्यांमध्येच अडकली
(Woman Stuck In New Dress) . अनेक प्रयत्न करूनही तिला यातून बाहेर येणं शक्य होत नव्हतं. हे प्रकरण इतकं गंभीर झालं की शेवटी तिनं आपल्या व्हिडिओ
(Video) बनवून आपल्या प्रियकराला
(Boyfriend) ऑफिसमधून मदतीसाठी घरी बोलावलं.
क्या बात है! सोशल मीडियाच्या माध्यमातून 'ही' कंपनी कुत्र्यांना बनवते सुपर मॉडेल
यानंतर तरुणीनं आपली झालेली ही अवस्था कॅमेऱ्यात कैद करत याचा व्हिडिओ सोशल मीडियावर
(Video on Social Media) शेअर केला. क्लिपमध्ये तिनं सांगितलं, की ती ड्रेसमध्ये अशाप्रकारे अडकली की प्रयत्न करूनही बाहेर येऊ शकली नाही. आता तिचा प्रियकर ऑफिसमधून येऊ तिला यातून बाहेर काढणार असल्याचं तिनं सांगितलं. व्हायरल व्हिडिओमध्ये ही तरुणी आपला ड्रेस ओढून काढताना दिसली, मात्र ती अपयथी ठरली. प्रियकर येईपर्यंत ही तरुणी आपल्या घरातील बाथरूममध्येच बसून राहिली.
VIDEO - भाओजीच्या नकळत मेहुणीने मारला चान्स; जबरदस्त प्लॅनिंग पाहून नवरदेव हैराण
व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट केल्या. एका व्यक्तीनं लिहिलं, की अडचणी कधीही येऊ शकतात. एका महिलेनं यावर कमेंट करत म्हटलं, की ड्रेस घ्या पण असाही नको. अनेकांनी हा व्हिडिओ मजेशीर असल्याचं म्हटलं आहे. वारंवार हा व्हिडिओ पाहिला जात आहे. तरुणीनं सांगितलं, की जेव्हा हा ड्रेस निघत नव्हता. तेव्हा तिला आपलं संपूर्ण फ्लॅशबॅक आयुष्यच आठवू लागलं होतं. कपडे काढण्याच्या प्रयत्नात ती बाथटबमध्येही कोसळली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.