मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बोल्ड ड्रेस घालून आजोबांच्या अंत्यसंस्काराला पोहोचली तरुणी; विचित्र पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

बोल्ड ड्रेस घालून आजोबांच्या अंत्यसंस्काराला पोहोचली तरुणी; विचित्र पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

मुलीनं फेसबुकवर आपले बोल्ड फोटो (Bold Photos) शेअर करत सांगितलं, की ती हे बोल्ड कपडे (Bold Dress) घालून आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारात जात आहे.

मुलीनं फेसबुकवर आपले बोल्ड फोटो (Bold Photos) शेअर करत सांगितलं, की ती हे बोल्ड कपडे (Bold Dress) घालून आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारात जात आहे.

मुलीनं फेसबुकवर आपले बोल्ड फोटो (Bold Photos) शेअर करत सांगितलं, की ती हे बोल्ड कपडे (Bold Dress) घालून आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारात जात आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 04 सप्टेंबर : आपल्या माणसांचं निधन हे कोणासाठीही अत्यंत वेदनादायी असतं. मात्र, या आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळीच (Funeral) काही विचित्र घटना घडली तर याचं सर्वांनाच वाईट वाटतं. कारण, जवळच्या लोकांची अशीच इच्छा असते, की असं काही घडू नये ज्यानं मृत व्यक्तीचा अपमान होईल. मात्र, नुकतीच एक अजब घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं आपल्या आजोबांच्या (Grandfather) अंत्यसंस्कारावेळी असं काही केलं, की सोशल मीडियावर या अंत्यसंस्काराची चर्चा रंगली.

आगीसोबत स्टंट करणं पडलं महागात; अचानक भडका उडाला अन्..., पाहा Shocking Video

सोशल मीडिया साईट रेडिट (Reddit) अजब वृत्तासाठी प्रसिद्ध आहे. सध्या या साईटवर एका मुलीची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या मुलीनं फेसबुकवर आपले बोल्ड फोटो (Bold Photos) शेअर करत सांगितलं, की ती हे बोल्ड कपडे (Bold Dress) घालून आपल्या आजोबांच्या अंत्यसंस्कारात जात आहे. या मुलीनं फोटोमध्ये फिश नेटचा ड्रेस आणि बूट घातलेले दिसत आहेत. याच कारणामुळे नेटकरी भडकले असून तिच्यावर टीका करत आहेत. मुलीच्या या कृत्यामुळे तिच्या आजोबांचे अंत्यसंस्कार चर्चेत आले आहेत. रेडिटवर शेअर केल्या गेलेल्या फेसबुक पोस्टमध्ये या मुलीचा फोटो आणि कॅप्शन दिसत आहे. मात्र, पोस्टमध्ये तिचं नाव दिसत नाहीये.

मुलीनं या पोस्टमध्ये लिहिलं, की आज माझ्या आजोबांचे अंत्यसंस्कार आहेत आणि हा मी हे कपडे घालून तिथेच जात आहे. मला फरक पडत नाही की लोक माझ्याबद्दल काय विचारल करतील. कारण ही दुखद घटना जरीही असली तरीही मला हे ठरवण्याचा पूर्ण हक्क आहे, की मी कुठे काय घालू. जर तुमच्याकडे सुंद र शरीर असेल तर ते फ्लॉन्ट करण्यात काहीही चुकीचं नाही आणि आता माझे आजोबा जिवंत असते, तर त्यांनी या कपड्यांना परवानगी नक्कीच दिली असती.

गाढ झोपलेल्या बायकोला उठवण्यासाठी चक्क...; नवऱ्याचा भलताच उद्योग VIRAL

सध्या हे पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही की हा स्क्रीनशॉट खरा आहे की नाही. त्यामुळे फोटोसोबत लिहिलेलं हे कॅप्शन खरं आहे, असा दावा आम्ही करत नाही. मात्र, रेडिटवर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या तरुणीवर टीका केली आहे. प्रत्येकानं तिला अशावेळी तर व्यवस्थित कपडे घालावे, असा सल्ला दिला आहे. एका यूजरनं म्हटलं, की ती अगदी बरोबरच बोलत आहे, की कोणते कपडे घालायचे हे ठरवणं तिचा हक्क आहे. मात्र, अशावेळी इतरांच्या भावनांचा आदर ठेवणंही गरजेचं आहे.

First published:

Tags: Bold photoshoot, Viral news