मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गाढ झोपलेल्या बायकोला उठवण्यासाठी चक्क...; नवऱ्याचा भलताच उद्योग VIRAL

गाढ झोपलेल्या बायकोला उठवण्यासाठी चक्क...; नवऱ्याचा भलताच उद्योग VIRAL

नवऱ्याने अशा पद्धतीने उठवलं की बायको चवताळली आणि...

नवऱ्याने अशा पद्धतीने उठवलं की बायको चवताळली आणि...

नवऱ्याने अशा पद्धतीने उठवलं की बायको चवताळली आणि...

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 सप्टेंबर : एखाद्याला उठवायचं असेल तर आपण त्या व्यक्तीला हलवून उठवतो. तरी ती व्यक्ती उठत नसेल तर तिच्या अंगावरील पांघरूण काढतो किंवा तिच्या प्रकाश पाडतो. नाहीतर तोंडावर पाणी मारून उठवतो. पण सोशल मीडियावर (Social media) असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, ज्यात नवऱ्याने आपल्या बायकोला (Husband wife video) उठवण्यासाठी भलताच प्रताप केला.

गाढ झोपलेल्या बायकोला (Husband prank with wife) उठवण्यासाठी नवऱ्याने केलेला प्रताप सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नवरा-बायको (Husband wife funny video) म्हणजे त्यांच्यात भांडणाप्रमाणे मस्ती आलीच. पण या नवऱ्याने आपल्या बायकोसोबत भलतीच मस्ती केली. बायकोपासून मार खाता खाता तो राहिला आहे.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

व्हिडीओत पाहू शकता बायको सोफ्यावर आरामात झोपली आहे. तिला गाढ झोप लागली आहे. तिचा नवरा तिथं येतो. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो.

हे वाचा - लग्नादिवशीच नवरा-नवरीचा प्रताप! कॅमेऱ्यात कैद झालं 'ते' कृत्य; VIDEO VIRAL

सुरुवातीला तो तिच्या चेहऱ्यावर सुईने टोचतो. महिलेला तेव्हा जाग येते. तिला वाटतं डास वगैरे चावत असावा म्हणून ती खाजवते. असं दोनदा होतं. तिसऱ्यावेळी तिचा नवरा तिच्या चेहऱ्यावर अंडं ठेवतो आणि तिच्या चेहऱ्यावर सुई टोचतो. आधी डास म्हणून चेहऱ्यावर फक्त खाजवणारी महिला इतकी वैतागते की ती डासाला मारायचं म्हणून आपल्या तोंडावर पटकन मारते आणि तिच्या चेहऱ्यावरील अंड फुटतं. ती झोपेतून धाडकन उठते.

झोपमोड केल्याने ती संतप्त झाली आहे. नवरा तिला पाहून हसत राहतो आणि ती त्याच्यावर सर्व राग काढते. त्याला इतकी बडबडते इतकी बडबडते की ती अर्धवट झोपेत आहे आणि नवरा तिच्यापासून दूर आणि सोफ्याच्या आड आहे म्हणून ठिक आहे. पण तो तिच्या हाताला लागला असता तर तिने त्याची चांगलीच धुलाई केली असती.

हे वाचा - VIDEO: मंडपातच चढला नवरीचा पारा; पुढे जे केलं ते पाहून पाहुणेही थक्क

hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून बिलकुल हसू आवरत नाही. त्यावर अशाच बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos, Wife and husband