नवी दिल्ली 04 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात अनेकदा काही कलाकार लोकांचे व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत असतात. अनेकदा तर लोक आपलं वेगळं कौशल्य दाखवण्यासाठी जीवही धोक्यात घालतात. काही लोकांना यात यश मिळतं तर काहींची मस्करी होते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एका व्यक्तीला आगीसोबत खेळणं चांगलंच महागात पडलं आहे. चक्क अजगराला घाबरुन वाघानं काढला पळ; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं व्हिडिओमध्ये दिसतं, की एक व्यक्ती आगीसोबत स्टंट (Stunt With Fire) करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दिखावा करत असतानाच त्याच्याकडून मोठी चूक होते आणि यात त्यांच्या तोंडातच आग लागते. हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्ही हैराण व्हाल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती माचिस जाळून आपल्या तोंडाजवळ नेतो. यानंतर असं वाटतं, जणू तो आपल्या तोंडातूनच आग बाहेर सोडत आहे. मात्र, इतक्यात ही आग त्याच्या शरीराकडे पसरू लागते. यानंतर काही लोक त्याच्या मदतीसाठी धावून येतात आणि ही आग विझवून त्याचा जीव वाचवतात.
खतरनाक! उंच कड्यावरून झेपावत हवेत साधला डाव; कधीच पाहिला नसेल शिकारीचा असा VIDEO हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्यक्तीच्या मुर्खपणाबाबत बोलत व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की पुन्हा कधी असा खेळ करणार नाही. तर, आणखी एकानं लिगिलं, की अशा प्रकारचे स्टंट करण्याआधी आपण पूर्णपणे सावध राहाणं अगदी गरजेचं आहे. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.