जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पतीच्या 'porn addiction' मुळे वैतागली पत्नी, व्यथा सांगत मागितली ही मदत

पतीच्या 'porn addiction' मुळे वैतागली पत्नी, व्यथा सांगत मागितली ही मदत

(File Photo)

(File Photo)

महिलेनं पुढे सांगितलं, की त्या दोघांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. कॉलेजपासूनच ते दोघंही सोबत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 25 जुलै: पॉर्न पाहण्याची सवय ही अनेकदा हसतं-खेळतं आयुष्य उद्धवस्त करून जाते. पार्टनरच्या (Partner) पॉर्न पाहण्याच्या सवयीमुळे हैराण एका महिलेनं आपलं दुःख जगासमोर मांडलं आहे. रिलेशनशिप कॉलममध्ये एका महिलेनं सांगितलं, की ती आपल्या पार्टनरच्या सिक्रेट पॉर्न पाहण्याच्या अ‍ॅडिक्शनमुळे (Porn Addiction) प्रचंड वैतागली आहे. इतंकच नाही तर तिचा पार्टनर सेक्स साइटवर (Sex Site) दुसऱ्या महिलांसोबत संपर्कात असल्याचाही तिला संशय आहे. महिलेनं सांगितलं, की मी माझ्या पार्टनरसमोर या गोष्टीचा उल्लेख केला, तेव्हा त्यानं म्हटलं की मी तुला धोका देत नाहीये. मात्र, आता मी त्याच्यावर आणखी विश्वास नाही ठेवू शकत. त्यानं या गोष्टीसाठी माझी माफीही मागितली आहे आणि चूक सुधारण्याची एक संधीही मागितली आहे, असंही महिलेनं सांगितलं. पुढे ती म्हणाली, की मी प्रेमासाठी माझ्या पार्टनरला दुसरी संधी दिली आहे, मात्र या सदम्यातून मी बाहेर येऊ शकेल, असं वाटत नाही. VIDEO: लग्नातच वैतागली नवरीबाई; नवरदेवासोबत केलं असं काही की सगळेच अवाक महिलेनं पुढे लिहिलं, कि मला असा संशय आहे, कि माझा पार्टनर अनेक वर्षांपासून असंच जीवन जगत आहे. तो फक्त दाखवण्यासाठी माझ्यासमोर प्रेमाचं नाटक करतो. कारण त्याला त्याचं सत्य कधी माझ्यासमोर येऊ द्यायचं नाही. महिलेनं सांगितलं कि त्याची ही सवय उघड झाल्यानंतर त्यानं ऑनलाईन सर्च हिस्ट्रीदेखील डिलीट केली. त्यामुळे, आता ती अशा व्यक्तीचा शोध घेत आहे, जो तिला हे सर्व रिस्टोर करण्यात मदत करू शकेल आणि संपूर्ण सत्य तिच्या समोर येईल. वरमाळा घालतानाच नवरीनं काढला पळ; नवरदेवाची भलतीच फजिती, मंडपातील Video Viral महिलेनं पुढे सांगितलं, कि त्या दोघांचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे. कॉलेजपासूनच ते दोघंही सोबत आहेत. पार्टनरच्या या सवयीमुळे वैतागलेल्या महिलेनं रिलेशनशिप एक्सपर्टकडे मदत मागितली. एक्सपर्टनं सल्ला देत म्हटलं, की पार्टनरचं संपूर्ण सत्य जाणून तुम्हाला शांती मिळणार नाही. तर, तुम्ही आणखीच जास्त नाराज व्हाल. त्यामुळे हे नातं पुढे कायम ठेवायचं की संपवायचं याबाबत निर्णय घ्या. यासाठी तुम्ही रिलेशनशिप काउन्सिलिंगची मदत घेऊ शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात