Home /News /viral /

वरमाळा घालतानाच नवरीनं काढला पळ; नवरदेवाची भलतीच फजिती, मंडपातील Video Viral

वरमाळा घालतानाच नवरीनं काढला पळ; नवरदेवाची भलतीच फजिती, मंडपातील Video Viral

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नसमारंभात स्टेजवर वरमाळेचा कार्यक्रम सुरू आहे. नवरी अन् नवरदेव दोघंही स्टेजवर आहेत. नवरदेव आधी नवरीबाईला वरमाळा घालतो.

    नवी दिल्ली 25 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) दररोज कित्येक लग्नसमारंभांमधील व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) झाल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या भागातील लग्न, त्यातील वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आपल्याला यात पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय इमोशनल (Emotional Video) असतात. मात्र, काही व्हिडिओ इतके विनोदी (Funny Video) असतात की ते पाहून तुम्हीही हसू आवरू शकत नाही. असाच एक लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओमध्ये दिसतं की वरमाळेदरम्यान नवरीबाई अचानक खेळ खेळू लागते. अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल! व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की लग्नसमारंभात स्टेजवर वरमाळेचा कार्यक्रम सुरू आहे. नवरी अन् नवरदेव दोघंही स्टेजवर आहेत. नवरदेव आधी नवरीबाईला वरमाळा घालतो. मात्र, नवरदेव वरमाळा घालू लागताच नवरी मागे सरकते. नवरदेव तिला वरमाळा घालण्यासाठी पुढे येऊ लागताच ती स्टेजवरच पळू लागते. नवरदेव वरमाळा घालण्यासाठी नवरीच्या मागे पळू लागतो. मात्र, नवरी सोफ्याच्या मागे जाऊन उभा राहते. यानंतर नवरदेवाचे मित्र हा सोफा बाजूला करतात. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर नवरीबाई नवरदेवाच्या समोर थांबते आणि नवरदेव तिला वरमाळा घालतो. ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला तरुणीने लगावली कानशिलात; VIDEO तुफान VIRAL लग्नातील हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्यासोबतच यावर वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत. नवरीबाईनं एकदम चांगली कबड्डी खेळल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. लग्नातील हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, हे नक्की.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Wedding video

    पुढील बातम्या