मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO: लग्नात झालेल्या दुर्लक्षामुळे वैतागली नवरीबाई; नवरदेवासोबत केलं असं काही की सगळेच अवाक

VIDEO: लग्नात झालेल्या दुर्लक्षामुळे वैतागली नवरीबाई; नवरदेवासोबत केलं असं काही की सगळेच अवाक

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. यात पाहायला मिळतं, की नवरदेवाच्या बाजूने त्याची मित्रमंडळी गर्दी करून उभा आहेत. मात्र, नवरीकडे कोणीच लक्ष देत नाहीये.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 25 जुलै: लग्नसमारंभात (Marriage Function) सर्वांचं लक्ष नवरी अन् नवरदेवाकडेच असतं. कारण लग्नात तेच आकर्षणाचं केंद्र असतात. काही पाहुणे नवरी-नवरदेवासोबत फोटो घेण्यासाठी, काही त्यांना आशिर्वाद देण्यासाठी तर काही असंच मजा मस्ती करण्यासाठी स्टेजवर पोहोचतात. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या लग्नातील व्हिडिओमध्ये वेगळंच काही पाहायला मिळतं. या व्हिडिओमध्ये नवरीनं नवरदेव (Bride Groom Video) आणि पाहुण्यांवर नाराज होऊन असं काही केलं की सगळे तिच्याकडेच पाहत राहिले. घटनेचा व्हिडिओ (Wedding Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे.

वरमाळा घालतानाच नवरीनं काढला पळ; नवरदेवाची भलतीच फजिती, मंडपातील Video Viral

सोशल मीडियावर व्हायरल लग्नातील हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. लग्नानंतर नवरा-बायकोमध्ये होणारी भांडणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, लग्नाच्या स्टेजवरच नवरदेव नवरीला भांडताना तुम्ही कदाचितच पाहिलं असेल. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल. यात पाहायला मिळतं, की नवरदेवाच्या बाजूने त्याची मित्रमंडळी गर्दी करून उभा आहेत. मात्र, नवरीकडे कोणीच लक्ष देत नाहीये. अशात नवरीबाई थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन बसली.

अंगाचा थरकाप उडवणारे स्टंट; लग्नात तरुणांनी घातला धुडगूस, VIDEO पाहून हादराल!

स्टेजवरच नवरीचं हे कृत्य पाहून उपस्थित सगळेच हैराण झाले. नवरीच्या आजूबाजूला बसलेले सगळे नातेवाईक तिच्याकडे पाहतच राहिले. त्यांना अचानक हे समजलंच नाही की पाहुण्यांच्या समोरच नवरीनं असं का केलं. या वेडिंग व्हिडिओमध्ये पाहुण्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. हा व्हिडिओ बातमी देईपर्यंत 1 लाख 23 हजारहून अधिकांनी पाहिला होता. नेटकरी या व्हिडिओ निरनिराळ्या कमेंट करत आहेत.

First published:

Tags: Bride, Marriage, Social media, Viral video., Wedding, Wedding video