मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'2 मुलांसोबत एकाच सोफ्यावर झोपावं लागतं'; कपलनं व्यथा मांडत थेट प्रशासनाकडे मागितली मदत

'2 मुलांसोबत एकाच सोफ्यावर झोपावं लागतं'; कपलनं व्यथा मांडत थेट प्रशासनाकडे मागितली मदत

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये राहणारी कॅथरीन सेलिसियस आणि शेन टर्नर आपल्या तीन मुलांसोबत एका खोलीच्या घरात राहते. तिच्या घरात एक बेड आणि एक सोफा आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 26 ऑक्टोबर : कुटुंब (Family) मोठं असेल तर अनेकदा घरात राहायला जागा कमी पडते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना भरपूर समस्यांना सामोरे जावं लागतं. मात्र, अनेकदा कुटुंब छोटं असूनही घरात राहण्यासाठी जागा कमी पडते. असंच काहीसं घडत आहे इंग्लंडच्या एका कपलसोबत (Couple). त्यांचं घर इतकं लहान आहे, की त्यांना सोफ्यावर झोपावं लागतं (Family Sleep on Sofa).

वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळीच मुलीचं विचित्र कृत्य; फोटो पाहून संतापले नेटकरी

इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये राहणारी कॅथरीन सेलिसियस आणि शेन टर्नर आपल्या तीन मुलांसोबत एका खोलीच्या घरात राहते. तिच्या घरात एक बेड आणि एक सोफा आहे. मोठ्या मुलाला ADHD डिसॉर्डर असल्याने त्याला एकट्यालाच बेडवर झोपावं लागतं. यामुळे हे कपल मागील बऱ्याच काळापासून आपल्या दोन मुलांसोबत सोफ्यावर झोपूनच दिवस काढत आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, कपलनं बर्मिंघम सिटी काउन्सिलच्या हाउसिंग डिपार्टमेंटकडे मदत मागितली. त्यांचं नाव हाउसिंग डिपार्टमेंटच्या रजिस्टरमध्ये नोंदवलं आहे. मात्र, त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पुढे नेहमीच शंभरहून अधिक लोक असतात. हे सर्वच घर मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एका वर्षापूर्वी त्यांना प्रायोरिटी बँडमध्ये ठेवलं गेलं होतं, मात्र आतापर्यंत त्यांना घर मिळालेलं नाही.

So cute! 'मनिके मागे हिते'चं बोबडं व्हर्जन; चिमुकलीच्या आवाजात हे गाणं ऐकलंत का?

कॅथरीननं म्हटलं, की मुलांसोबत इतक्यात छोट्या घरात राहाणं अतिशय अवघड आहे. बऱ्याच काळापासून आम्ही व्यवस्थित झोपूही शकलो नाही. खूप प्लॅनिंग करूनही आम्ही व्यवस्थित राहू शकत नाही. घर अगदी लहान असल्यामुळे मी काहीही केलं तरी मुलांना डिस्टर्ब होतं. आमच्याकडे याशिवाय दुसरी जागाही नसल्याने सामान ठेवण्यासही अडचणी येतात. महिलेनं सांगितलं की घरात टीव्ही किंवा वॉशिंग मशीन ठेवण्यासाठीही जागा नाही. महिलेनं सांगितलं की घरातील वस्तू तिला डब्यामध्ये ठेवाव्या लागतात, कारण याठिकाणी कपाटही उपलब्ध नाही.

First published:

Tags: Viral news