मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oh So cute! Manike Mage Hithe चं बोबडं व्हर्जन; चिमुकलीच्या आवाजात हे गाणं ऐकलंत का?

Oh So cute! Manike Mage Hithe चं बोबडं व्हर्जन; चिमुकलीच्या आवाजात हे गाणं ऐकलंत का?

चिमुकलीने गायलेल्या मनिके मागे हिते (Manike mage hite) गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

चिमुकलीने गायलेल्या मनिके मागे हिते (Manike mage hite) गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

चिमुकलीने गायलेल्या मनिके मागे हिते (Manike mage hite) गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 ऑक्टोबर : सध्या सोशल मीडियावर गेलात की जिथं तिथं मनिके मागे हिते (Manike Mage Hithe) गाणं ऐकायला मिळतं. श्रीलंकन गायिका योहानी (Yohani) दिलोका डी सिल्वाने गायलेलं हे गाणं धुमाकूळ घालतं आहे (Manike Mage Hithe song video) . योहानीच्या गोड आवाजाने सर्वांचं मन तर जिंकलंच आहे. या गाण्याचे काही भाषांमध्ये व्हर्जनही आले आहेत. अशात आता एका चिमुकलीचाही व्हिडीओ व्हायरल होतो आहे (Little girl sang Manike Mage Hithe). जिनं आपल्या बोबड्या बोलात हे गाणं गायलं आहे.

मनिके मागे हिते गाणं गाणाऱ्या क्युट आणि गोड आवाजाचा योहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. आता हेच गाणं बोबड्या बोलात गाणाऱ्या एका चिमुकलीचाहा व्हिडीओ तितकाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओनेही सर्वांचं मन जिंकलं आहे. लिसा एन निमालाचंद्र इन्स्टाग्राम युझरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिची मुलगी आलिया सीलनोने हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला आहे.

व्हिडीओत पाहू शकता, जसं हे गाणं लागतं तशा मुलीचा उत्साह वाढतो. आपल्या दोन्ही हातात टेडी-बिअर पकडून ती हे गाणं गुणगुणताना दिसते.

हे वाचा - बाबो! गाडीएवढी उंची नाही अन् चिमुकल्याने एका चाकावर सुसाट पळवली बाईक; पाहा VIDEOहे गाणं तसं आपल्यालाही नीटपणे गाता येणार नाही. ही तर एक लहान मुलगी आहे. त्यामुळे जिथं तिला शब्द येत नाही तिथं ते शेवटचा शब्द धरताना दिसते आणि जिथं तिला येते तिथं ती आपल्या बोबड्या बोलात गाते.

व्हिडीओत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, आलिया सीलोनचं मानिके मगे हितेचं कव्हर व्हर्जन  @yohanimusic द्वारा कव्हर करण्यात आलं आहे. आलिया योहानीची फॅन आहे, कदाचित ती सर्वात कमी वयाची फॅन असावी.

हे वाचा - VIDEO : चिमुरड्याने सैन्याची गाडी पाहताच केलं असं काही की डोळ्यात पाणीचं येईल

मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं. सिंहली भाषेतलं. मूळ सिंहली भाषेतलं गाणं 2020 मध्ये रीलिज झालं होतं. ते श्रीलंकन रॅपन आणि गायिका योहानी डीसिल्व्हा हिने सिंहली भाषेतच मे 2021 मध्ये पुन्हा गायलं. अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झालं आणि अर्थातच इथून जगभर. योहानी आणि सतीशन या दोन गायकांनी या गाण्याचं आणखी एक व्हर्जन गायलं. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

First published:

Tags: Small child, Song, Viral, Viral videos