मराठी बातम्या /बातम्या /Viral /पाळीव माकडाला दिले ड्रग्ज अन्...; महिलेनं मुक्या जीवासोबत केलेलं संतापजनक कृत्य जाणून हादराल

पाळीव माकडाला दिले ड्रग्ज अन्...; महिलेनं मुक्या जीवासोबत केलेलं संतापजनक कृत्य जाणून हादराल

Woman tortured  Marmoset Monkey: महिलेनं आपल्या पाळीव माकडाचा अनेक महिने छळ केला . यानंतर महिलेवर कडक कारवाई केली गेली आहे

Woman tortured Marmoset Monkey: महिलेनं आपल्या पाळीव माकडाचा अनेक महिने छळ केला . यानंतर महिलेवर कडक कारवाई केली गेली आहे

Woman tortured Marmoset Monkey: महिलेनं आपल्या पाळीव माकडाचा अनेक महिने छळ केला . यानंतर महिलेवर कडक कारवाई केली गेली आहे

नवी दिल्ली 12 डिसेंबर : माणूस आणि प्राण्याचं नातं अतिशय खास असतं. मात्र या नात्यात प्राणी माणसावर जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम माणूस करत नाही. प्राण्यांचं प्रेम कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. पाहायला गेलं तर जगात अनेक प्राणीप्रेमी असतात (Animal Lovers). जे प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात. मात्र काही लोक असेही असतात ज्यांना प्राण्यांना त्रास द्यायला आवडतं. अशी विचित्र प्रवृत्तीच्या लोकांचं कृत्य ऐकून कोणालाही राग येतो. नुकतंच ब्रिटनमधील एका महिलेचं कृत्य जाणूनही लोक भडकले आहेत. या महिलेनं एका लहानशा माकडाचा वाईट पद्धतीने छळ केला.

ग्राहकाने वेट्रेसला दिलेली टीप पाहून मॅनेजरही भडकला; तरुणीची नोकरीवरून हकालपट्टी

साउथ वेल्सच्या न्यू पोर्टमध्ये राहणारी 38 वर्षीय विकी हॉलेंड खरंतर चार मुलांची आई आहे. आता तिचा जो चेहरा जगासमोर आला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे. महिलेनं आपल्या पाळीव माकडाचा अनेक महिने छळ केला (Woman Tortured Marmoset Monkey). यानंतर महिलेवर कडक कारवाई केली गेली आहे. विकीकडे मारमोसेट माकड होतं, ही माकडाचीच एक प्रजाती आहे. मात्र, दिसायला हे अतिशय लहान असतात.

द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना एक व्हिडिओ दाखवला गेला. यात दिसलं की मायली नावाचं एक माकड टॉयलेटमध्ये पडलेलं आहे आणि महिला अचानक येऊन फ्लश करते (Woman Flush Monkey in Toilet). यानंतर हे माकड पाण्यासोबत आतमध्ये जाऊ लागतं. हे पाहून महिला अतिशय खूश होते आणि जोरजोरात हसू लागते. महिलेच्या या कृत्यामुळे माकड भरपूर घाबरल्याचं दिसतं.

10 फूट उंचावरुन उडी घेत सिंहिणीने हवेतच केली काळवीटाची शिकार; पाहा VIDEO

इतकंच नाही तर एका व्हिडिओमध्ये ही महिला माकडाला कोकीन ड्रग्ज चारण्याचा प्रयत्न करतानाही दिसते. मिळालेल्या माहितीनुसार महिलेनं आपल्या माकडाची अजिबातही काळजी घेतली नाही. ती त्याला मटण, मांस आणि बर्गर खाऊ घालायची. माइलीला वाचवणाऱ्या लोकांनी सांगितलं की त्यांनी इतकं घाबरलेलं माकड कधीच पाहिलं नव्हतं. कोर्टाने हे प्रकरण गांभीर्याने घेत विकीला आयुष्यभर प्राणी न पाळण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच महिलेला तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली. महिलेला 55 हजार रुपये दंडही भरावा लागणार आहे.

First published:
top videos

    Tags: Pet animal, Viral news