नवी दिल्ली 12 डिसेंबर : अनेक विद्यार्थी आपला रोजचा खर्च आणि शाळेची फी भरण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाईम जॉब (Part Time Job) करतात. अशीच एक विद्यार्थीनी रयान ब्रांट एका रेस्टॉरंटमध्ये वेट्रेसचं काम करायची. एक दिवस या रेस्टॉरंटमध्ये एक अतिशय श्रीमंत व्यक्ती आला. रयानने त्यांना जेवण सर्व केलं. हा व्यक्ती रयानच्या सर्व्हिसमुळे इतका आनंदी झाला की त्याने तिला साडेतीन लाख रूपये टीप दिली (Waitress got 3 Lakh 50 Thousand Tip from Customer). मुलींसाठी पित्यानं चक्क खिडकीवर तयार केलं बर्फाचे शहर, Photos पाहुन व्हाल थक्क तुम्ही विचार करत असाल की ही तर अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, रयानचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. तिला आपली नोकरी यामुळे गमवावी लागली. जेव्हा रयानला साडेतीन लाख रुपये टीप मिळाली तेव्हा रेस्टॉरंटच्या मॅनेजरने तिला ही टीप इतर वेट्रेससोबत शेअर करण्यास सांगितलं. रेस्टॉरंटच्या या निर्णयामुळे रयान हैराण झाली. कारण याआधी मॅनेजरने कधीही एखादी टीप शेअर करायला सांगितली नव्हती.
जेव्हा रयानला टीप मिळाली तेव्हा मॅनेजरने पॉलिसीबद्दल बोलत तिला हे पैसे शेअर करायला सांगितले. मात्र रयानने ही बाब टीप देणाऱ्या श्रीमंत व्यक्तीला सांगितली. कारण या व्यक्तीने रयानच्या कामावर खूश होऊन आणि तिची कहाणी ऐकून तिला ही टीप दिली होती. याच कारणामुळे रयानचं मोठं नुकसान झालं आणि तिला आपली नोकरी गमवावी लागली. रेस्टॉरंटरने ही बाब या श्रीमंत व्यक्तीला सांगितल्याप्रकरणी रयानला नोकरीवरुन काढलं. कमाल झाली! बॉस रागावला म्हणून महिलेने चक्क गोदामाला लावली आग, Photos झाली Viral यानंतर वेट्रेसला टीप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीने असं म्हटलं की तिची चांगली सर्व्हिस आणि वागणुकीमुळे तो तिला साडेतीन लाख रूपये टीप देत आहे. हे ऐकून रयान रडू लागते. रयानला वाटलं की या पैशातून ती आपलं कर्ज फेडू शकेल आणि स्कूलची फीदेखील भरू शकेल. मात्र, नोकरी गमावताच तिचा आनंदही गायब झाला.