नवी दिल्ली 12 डिसेंबर : सोशल मीडिया वाईल्डलाईफचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Wildlife Viral Videos) होत राहतात. नेटकऱ्यांना जंगली प्राण्यांमधील लढाई पाहायला भलतंच आवडतं. याच कारणामुळे असा कंटेट सोशल मीडियावर (Social Media) अपलोड होताच व्हायरल होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात काळवीटाची शिकार करणाऱ्या दोन सिंहिणी पाहायला मिळतात. यात एका सिंहिणीने 10 फूट उंचीवरून उडी घेत काळवीटाला हवेतच आपल्या जबड्यात पकडलं (Lioness Attacked on Impala). हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कमाल झाली! बॉस रागावला म्हणून महिलेने चक्क गोदामाला लावली आग, Photos झाली Viral जंगलातील नियम आणि कायदे थोडे वेगळे असतात. इथे जिवंत राहण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. इथे दररोज कोणालातरी मरावंच लागतं. मात्र सिंहाचा दराराच वेगळा असतो. त्याच्यापुढे सगळेच फिके पडतात. सध्या याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काळवीटाची शिकार करण्यासाठी दोन सिंहिणी त्याच्या मागे धावत आहेत. जीव वाचवण्यासाठी हे काळवीट उंचावरुन उडी घेतं. त्याच्यापाठोपाठ एक सिंहिणही सुमारे १० फूट उंचावरुन उडी घेते. विशेष म्हणजे सिंहिण हवेतच या काळवीटाला आपल्या जबड्यात पकडते. यानंतर काहीच सेकंदात व्हिडिओ संपतो.
काळवीटाची शिकार करणाऱ्या सिंहिणींचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. दोन दिवसाआधी शेअर झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 हजार जणांनी लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओ प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ‘या’ माशात अडकलाय सर्वांचा जीव! ग्राहक 3 लाख देतायेत तरी मालक विकायला तयार नाही एका यूजरने कमेंट करत लिहिलं, सिंहिणीची शिकारीवरील नजर कधीच हटत नाही. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार रँडी ऑर्टनची आठवण झाली. यूजरने कमेंट करत लिहिलं, सिंहिणीने अगदी रँडी ऑर्टनप्रमाणेच काळवीटाला पकडलं. याशिवायही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.