हा व्हिडिओ केवळ 9 सेकंदांचा आहे, परंतु हे दृश्य खूपच क्रूर आणि भयानक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी महनतेश संगीताला बेदम मारहाण करताना दिसत आहे. यादरम्यान तो महिलेच्या पोटावर लाथही मारतो, त्यामुळे ती वेदनेने ओरडते आणि काही पावले मागे जाते. मात्र महनतेश इथेच थांबत नाही, तो संगीताला सतत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करतो. त्यानंतर तो तिला चापट मारू लागतो. या हल्ल्यादरम्यान महिलेच्या हातातील कागदपत्रंही खाली पडल्याचं पाहायला मिळतं. भीषण अपघातात गाडीचा अक्षऱशः चक्काचूर झाला; मात्र चालकाला खरचटलंही नाही, थक्क करणारा VIDEO या लाजिरवाण्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांनी या संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, 'असं पब्लिक पाहून लाज वाटते. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली जात आहे आणि लोक शांतपणे तमाशा पाहत आहेत.' आणखी एका यूजरने या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी असं म्हटलं आहे. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं की, 'अशाप्रकारे कोणी प्राण्यालाही मारत नाही.' एकंदरीतच हा व्हिडिओ पाहून लोक चांगलेच भडकले आहेत आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत#SHOCKING A #woman #lawyer named Sangeetha was brutally assaulted and injured at #Bagalkote #Karnataka. #Worse: many people watched and didn't come forward to help her. Sangeetha and her assaulter Mahantesh are neighbours.And they had differences over some issue pic.twitter.com/D3KhJRc2fU
— Mohammad fasahathullah siddiqui (@MdFasahathullah) May 14, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking video viral