मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अजब प्रथा; विवाहित स्त्रियांची चोरी करतात पुरुष; महिलांना मिळते अनेकांसोबत संबंध ठेवण्याची सूट

अजब प्रथा; विवाहित स्त्रियांची चोरी करतात पुरुष; महिलांना मिळते अनेकांसोबत संबंध ठेवण्याची सूट

या जमातीची सर्वात खास प्रथा आहे दुसऱ्या पुरुषाची पत्नी चोरणं. इथे एक खास सण साजरा केला जातो, याला याकी म्हणतात. हा सण दहा दिवस चालतो

या जमातीची सर्वात खास प्रथा आहे दुसऱ्या पुरुषाची पत्नी चोरणं. इथे एक खास सण साजरा केला जातो, याला याकी म्हणतात. हा सण दहा दिवस चालतो

या जमातीची सर्वात खास प्रथा आहे दुसऱ्या पुरुषाची पत्नी चोरणं. इथे एक खास सण साजरा केला जातो, याला याकी म्हणतात. हा सण दहा दिवस चालतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : लग्न हे जगातील प्रत्येक भागात आणि समाजात अतिशय पवित्र मानलं जातं. पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र एक कुटुंब वाढवण्याच्या उद्देशाने बांधल्या जाणाऱ्या या बंधनाला वेगवेगळ्या देशांत वेगवेगळं रूप दिलं गेलं आहे (Marriage Traditions). काळ बदलला तसं आता लग्नाच्या पद्धतीतही अनेक ठिकाणी बदल झाला आहे. मात्र, काही आदिवासी जमाती आजही जुन्या प्रथांचं आणि परंपरांचं पालन करत आहेत. या परंपरा आजच्या लोकांना विचित्र वाटू शकतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एक प्रथेबद्दल सांगणार आहोत. यात पुरुष एका खास उत्सवाच्या माध्यमातून दुसऱ्याची पत्नी चोरतात तसंच महिलांनाही एकापेक्षा अधिक पुरुष पार्टनर ठेवण्याची परवानगी असते (Women Allowed to Have Multiple Partners).

अफ्रिकेच्या साहेल क्षेत्रात राहणारी आदिवासी जमात वोदाबी जगभरात आपल्या अजब परंपरेसाठी प्रसिद्ध आहे (Wodaabe Weird Tradition). या जमातीतील स्त्रियांना भरपूर सूट देण्यात आली आहे. इथे अशा परंपरा आहेत, ज्यांना जगातील इतर भागांत पाप किंवा चुकीचं समजलं जाईल. इथे लग्न आणि संबंध याच्या वेगळ्याच पद्धती आहेत. इथले लोक लग्नाकडे त्या पद्धतीनं पाहत नाहीत जसं जगातील इतर देश पाहतात.

चुकूनही बायकोचा वाढदिवस विसराल, तर जाल तुरुंगात! या देशातील अजब कायद्याची चर्चा

या जमातीची सर्वात खास प्रथा आहे दुसऱ्या पुरुषाची पत्नी चोरणं. इथे एक खास सण साजरा केला जातो, याला याकी म्हणतात. हा सण दहा दिवस चालतो. या सणाला वाईफ स्टिलिंग फेस्टिवलही (Wife Stealing Festival) म्हटलं जातं. या सणाच्या दिवशी पुरुष बराच वेळ तयार होण्यासाठी घेतात आणि अजब वेशभूषा करतात. ते आपल्या चेहऱ्यावर मेकअपही करतात. ओठांवर पेंटही लावतात, जेणेकरून त्यांचे दात जास्त चमकतील आणि शुभ्र दिसतील.

महिलांना आकर्षित कऱण्यासाठी पुरुष अशा पद्धतीनं नटतात. यानंतर ते महिलांसमोर अनोखं नृत्य करतात. यातील बहुतेक महिला विवाहित असतात. या महिलांना अधिकार असतो या पुरुषांपैकी कोणालाही आपला पार्टनर म्हणून निवडण्याचा. यानंतर महिला आवडलेल्या पुरुषासोबत लग्न करून पहिल्या पतीला घटस्फोट देते किंवा मग दोन्ही पुरुषांसोबत राहते.

खुर्चीवर बसल्या बसल्याच आला मृत्यू, समोरच्या व्यक्तीलाही आली नाही कल्पना

फेस टू फेस अफ्रिका वेबसाईटच्या वृत्तानुसार, या सणाच्या रात्री महिला आपला पार्टनर निवडतात. ती एकापेक्षा अधिक पार्टनरही निवडू शकते आणि त्यांच्यासोबत संबंध ठेवू शकते. पत्नी चोरण्याची ही प्रक्रिया याच पद्धतीनं एक रात्र, काही रात्री किंवा पूर्ण आयुष्यभरही लग्नाच्या रूपात सुरू राहते. वेबसाईटच्या वृत्तानुसार, महिलेचा पहिला पती तिच्या घरचे निवडतात आणि दुसरा ती स्वतः या सणाच्या माध्यमातून निवडते. मात्र, जर एखाद्या महिलेचं लग्न कुरुप पुरुषासोबत झालं आणि पतीला माहिती असेल की पत्नीला आपण आवडत नाही तर तो तिला दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवू देतो. जेणेकरून त्यांना सुंदर मुलं व्हावी.

First published:

Tags: Marriage, Wife and husband