मराठी बातम्या /बातम्या /Viral /खुर्चीवर बसल्या बसल्याच आला मृत्यू, समोरच्या व्यक्तीलाही आली नाही कल्पना, CCTV त दिसला अखेरचा क्षण

खुर्चीवर बसल्या बसल्याच आला मृत्यू, समोरच्या व्यक्तीलाही आली नाही कल्पना, CCTV त दिसला अखेरचा क्षण

 रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्याच एका (death of a person in the chair video goes viral) व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्याच एका (death of a person in the chair video goes viral) व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्याच एका (death of a person in the chair video goes viral) व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

चंदिगढ, 9 नोव्हेंबर : रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्याच एका (death of a person in the chair video goes viral) व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हॉटेलमध्ये कॅश काउंटरवर बसून ग्राहकांकडून त्यांचं बिल घेण्याचं (Heart attack on cash counter) काम ही व्यक्ती करत होती. त्यावेळी अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि बसल्या जागीच व्यक्तीचा जीव गेला. ही घटना सीसीटीव्हीत (Incidene recorded in CCTV) कैद झाली आहे. केवळ काही क्षणांपूर्वी पैशांची देवाणघेवाण करणारी व्यक्ती अचानक मृत्युमुखी पडल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. " isDesktop="true" id="628860" >

बसल्या जागी आला हार्ट अटॅक

हरियाणातील फतेहबादमध्ये रेस्टॉरंटच्या कॅश काउंटरवर बसून ही व्यक्ती नेहमीप्रमाणं ग्राहकांकडून पैसे स्विकारत होती. ग्राहकांचे बिल पाहून त्यांच्याकडून पैसे घेणे आणि उरलेले सुट्टे पैसे परत देणे, हे काम सुरु होतं. रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची बऱ्यापैकी गर्दीदेखील होती आणि दर काही सेकंदांनी नवे ग्राहक पैसे देण्यासाठी काउंटरवर येत होते. नेहमीच्या सराईतपणाने ही व्यक्ती त्यांच्याकडून पैसे घेत होती, ते ड्रॉवरमध्ये ठेवत होती आणि उरलेले सुट्टे पैसे त्यांना परत देत हसतमुखााने निरोप देत होती.

हे वाचा- क्रांती रेडकरने नवाब मलिकांची केली राज्यपालांकडे तक्रार, कोश्यारी म्हणाले...

अचानक आला अटॅक

एका ग्राहकाला पैसे दिल्यानंतर अचानक या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्याचं व्हिडिओत दिसतं. काम थांबवून अचानक ही व्यक्ती खुर्चीत मागे रेलते आणि मान टाकते. त्यानंतर काही क्षणांत ती खुर्चीवरून खाली कोसळते. मान मागे टाकून आऱाम करत असल्याप्रमाणे काही सेकंदांचा वेळ जातो. या काळात समोर थांबलेला ग्राहक त्या व्यक्तीला पैसे घेण्याची विनंतीदेखील करतो. मात्र त्याकडे व्यक्ती लक्ष देऊ शकत नाही. त्यानंतर अचानक ही व्यक्ती खुर्चीतून खाली कोसळते. समोर पैेसे देण्यासाठी थांबलेला ग्राहक भांबावून आणि घाबरून आपले पैसे उचलून तिथून निघून जातो. तर दुसरा एक ग्राहक समोर येऊन कोसळलेल्या व्यक्तीला सहारा देत त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. मात्र या घटनेत त्या व्यक्तीचा जीव जातो. जोरदार हृदयविकाराचा धक्का आल्यामुळेच या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूच्या कारणांचा अधिक उलगडा होऊ शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Death, Haryana, Health, Heart Attack