• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • चुकूनही बायकोचा वाढदिवस विसराल, तर जाल तुरुंगात! या देशातील अजब कायद्याची इंटरनेटवर चर्चा

चुकूनही बायकोचा वाढदिवस विसराल, तर जाल तुरुंगात! या देशातील अजब कायद्याची इंटरनेटवर चर्चा

जर कुणी बायकोचा वाढदिवस विसरेल, तर त्याला तुरुंगात (Husband may go to jail if he forgets wife birthday says news law in the country) जावं लागेल, असा नवा कायदा एका देशात असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

 • Share this:
  जर कुणी बायकोचा वाढदिवस विसरेल, तर त्याला तुरुंगात (Husband may go to jail if he forgets wife birthday says news law in the country) जावं लागेल, असा नवा कायदा एका देशात असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. एखाद्या देशाची संस्कृती, तिथल्या प्रशासनाचं स्वरुप आणि (Background of the law in the country) कायदा सुव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन कायदे तयार केले जातात. मात्र काही कायदे असे असतात, जे जुने असतात आणि कधीच बदलण्यात येत नाहीत. असे कायदे अनेकदा निरुपद्रवी असले, तरी कधी कधी मात्र त्यांचं भलतंच अवडंबर माजल्याचं दिसून येतं. प्रशांत महासागराच्या परिसरातील पॉलिनेशियन भागात सामोआ (Discussion over the strange law) नावाचा एक देश आहे, जिथला कायदा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. वाढदिवस विसराल तर जाल तुरुंगात या देशात एक असा कायदा आहे, ज्यामुळे एखादा पुरुष आपल्या पत्नीचा वाढदिवस विसरला, तर तो तुरुंगात जाऊ शकतो. सध्या या कायद्यावरून इंटरनेटवर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या देशातील सर्व पुरुषांना आता त्यांच्या बायकांचे वाढदिवस लक्षात ठेवणं बंधनकारक करण्यात आलं असून जर ही बाब विस्मरणात गेली, तर तुरुंगाची हवा खावी लागू शकते, अशी चर्चा आहे. या विचित्र कायद्याबाबत अनेकजण टीका करत असून वाढदिवस विसरण्यासारख्या किरकोळ बाबीसाठी तुरुंगवासाची शिक्षा कशी काय होऊ शकते, असा सवालही उपस्थित केला जात आहे. हे वाचा- अस्वलाने केला Poll Dance, बघणारे झाले खूश; पाहा मजेशीर VIDEO मूळ कायद्याचा विपर्यास एखादा कायदा मूळ कसा आहे, ते विसरून जेव्हा त्याचे वाट्टेल ते अर्थ लावले जातात,  तेव्हा काय होतं, हे या कायद्यातून दिसून येत असल्याचं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. काही वर्षांपूर्वी एका पत्नीने आपल्या पतीला मोबाईलवरून दुसऱ्या महिलेसोबत चॅट करताना पाहिलं होतं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यातून निराश होऊन महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं होतं. या घटनेची देशात जोरदार चर्चा झाली होती आणि पती-पत्नी संबंधांबाबत चर्चाही झडली होती. याच वेळी एक कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्यानुसार पतीनं पत्नीकडं दुर्लक्ष करणं, हा गुन्हा असल्याचं म्हणण्यात आलं होतं. मात्र या मूळ कायद्याचा विपर्यास आणि थट्टा होत होत त्याचा संबंध वाढदिवस लक्षात ठेवण्याशी जोडण्यात आला, अशी माहिती आहे.
  Published by:desk news
  First published: