लंडन, 16 सप्टेंबर : विना शारीरिक संबंधांशिवाय गर्भवती होण्याची घटना कोणालाही हैराण करू शकते. एका ब्रिटिश तरुणीसोबतही असंच काहीसं झालं आहे, ज्यावेळी तिला डॉक्टरांनी ती गर्भवती झाल्याचं सांगितलं. सामंथा गिब्सन नावाच्या तरुणीने ही भयंकर कहाणी शेअर केली आहे. तिने शारीरिक संबंध ठेवले नसतानाही डॉक्टरांनी तिला ती गर्भवती असल्याचं सांगितलं. सामंथा गिब्सनने ऑनलाइन आपला अनुभव शेअर केला. तिने सांगितलं, एका वर्षाहून अधिक काळ शारीरिक संबंध ठेवले नसतानाही डॉक्टरांनी मी गर्भवती असल्याचं सांगितलं. कोणाला याबाबत काही माहिती असेल, तर कृपया मला सांगा असं ती ऑनलाइन अनुभव शेअर कराताना म्हणाली. द सनच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकवर सामंथा गिब्सनचा व्हिडीओ 10 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून कमेंट करुन अनेक जण याप्रकारामागची कहाणी नेमकी काय आहे, हे जाणून घेऊ इच्छितात. त्यानंतर तिने आणखी एक दुसरा व्हिडीओ शेअर केला. ती म्हणाली, ‘डॉक्टरांनी चुकून तिचा ब्लड टेस्ट रिपोर्ट दुसऱ्या कोणाशी जोडला आहे.’ तिने पुढे सांगितलं, ‘मला अनेक दिवसांपासून चक्कर येत होती आणि पोटात दुखत होतं. काही दिवसांपूर्वी मी ब्लड टेस्टसाठी डॉक्टरांकडे गेली होती. परंतु टेस्टनंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीने मी पूर्णपणे हादरुन गेली.’
40 वर्ष जंगलात राहिला, शहरात आल्यावर 8 वर्षात मृत्यू, ‘रियल’ टारझनची शोकांतिका!
दुसऱ्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, ‘मी डॉक्टरांना सांगितलं, मी मागील एक ते दोन वर्षात एकदाही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मी गर्भवती होऊ शकत नाही. हे शक्य नाही. त्यानंतर त्यांनी मला एक स्ट्रिप टेस्ट करण्यास सांगितली आणि ती निगेटिव्ह आली.’
रस्त्यावर चालता चालताच हजामत; सायकलवरील फिरत्या सलूनचा VIDEO पाहिलात का?
माझ्या सतत पोटात दुखत असल्याने, चक्कर येत असल्याने डॉक्टरांनी मला गर्भवती असल्याचं सांगितलं. पण मी गर्भवती नसल्याचं सांगत तिने, अशाप्रकारे डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने तिला दिलेल्या उत्तराने ती पूर्णपणे हादरली असल्याचं म्हटलं.