• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • 40 वर्ष जंगलात राहिला, पण शहरात आल्यानंतर 8 वर्षांत मृत्यू, खऱ्याखुऱ्या टारझनची शोकांतिका!

40 वर्ष जंगलात राहिला, पण शहरात आल्यानंतर 8 वर्षांत मृत्यू, खऱ्याखुऱ्या टारझनची शोकांतिका!

तब्बल 41 वर्षं जंगलात राहिलेला हो वॅन लँग (Ho van lang) जेव्हा जगासमोर आला होता, तेव्हा तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता. दुर्दैवाने, जंगलातून पुन्हा शहरात राहायल्या आल्यानंतर अवघ्या आठ वर्षांमध्येच (Real life tarzan death) या रियल लाईफ टारझनचा मृत्यू झाला.

  • Share this:
मुंबई, 15 सप्टेंबर : जंगलात प्राण्यांच्या सान्निध्यात वाढलेल्या टारझन या काल्पनिक व्यक्तीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे; पण टारझन (Tarzan) ही काल्पनिक व्यक्तिरेखा असली, तरी व्हिएतनाममध्ये काही वर्षांपूर्वी अशीच एक व्यक्ती (Real life Tarzan) आढळून आली होती, जिला आपण खरोखरचा टारझन म्हणू शकू. तब्बल 41 वर्षं जंगलात राहिलेला हो वॅन लँग (Ho van lang) जेव्हा जगासमोर आला होता, तेव्हा तो चांगलाच प्रसिद्ध झाला होता. दुर्दैवाने, जंगलातून पुन्हा शहरात राहायल्या आल्यानंतर अवघ्या आठ वर्षांमध्येच (Real life tarzan death) या व्यक्तीचा मृत्यू झाला. गेल्या सोमवारी लँगने या जगाचा निरोप घेतला. 1972 मध्ये जेव्हा अमेरिका-व्हिएतनाम युद्ध (Vietnam var) सुरू होतं, तेव्हा अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यात लँगची आई आणि भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला होता. यानंतर लँगचे वडील त्याला आणि त्याच्या भावाला घेऊन गाव सोडून दूर जंगलात राहायला गेले. या जंगलामध्येच लँग लहानाचा मोठा झाला. जंगलातल्या 40 वर्षांच्या (Real life tarzan vietnam) काळात त्याने केवळ पाच व्यक्तींना पाहिलं होतं. प्रत्येक वेळी माणूस दिसला की हे सारे दूर पळून जात. या जंगलातच ते शिकार करून, फळं खाऊन आपली गुजराण करत होते. Real life Tarzan', who lived in Vietnamese jungle for over 40 years, dies of liver cancer यानंतर अल्वारो सेरेजो (Alvaro Serejo) नावाच्या एका फोटोग्राफरनं या सर्वांना आपल्या कॅमेऱ्यात टिपलं होतं. ही माणसं जिवंत असल्याचं त्यानंतर सर्वांना समजलं. त्यांना तेव्हा रेस्क्यू टीमने (Vietnam Tarzan rescued) एका जवळच्या गावात नेलं. या ठिकाणी लँगने पहिल्यांदाच महिला पाहिल्या होत्या. विशेष म्हणजे आपल्या व्यतिरिक्त आणखी माणसं या जगात आहेत याचीही कल्पना त्याला नव्हती. 'वन इंडिया'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 2013 मध्ये लँगची (Ho van lang comes to city) तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याच्या वडिलांनी वैद्यकीय मदतीसाठी माणसांशी संपर्क साधला होता. लँगचे वडील हो वान थान (Ho van than) यांना तेव्हाही वाटत होतं, की व्हिएतनाम युद्ध सुरू आहे; मात्र हे युद्ध संपल्याची माहिती मिळताच त्यांनी पुन्हा गावात राहण्यास सुरुवात केली. आपल्या भावाचे म्हणणं ऐकून लँगही आपल्या वडिलांसोबत वस्तीत राहायला आला होता. गावात राहायला आल्यानंतर त्याच वर्षी थान (Ho van than death) यांची तब्येत खालावण्यास सुरुवात झाली होती. 2017मध्ये एका अज्ञात आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर लँग मानवी वस्तीतच राहू लागला. आतापर्यंत जंगलात, कोणतीही भेसळ नसलेल्या गोष्टी खाणाऱ्या लँगला शहरातले पदार्थ रुचले नाहीत. तसंच, शहरी जीवनशैलीतला ताणही (Ho van lang stress) त्याला सहन झाला नाही. यासोबतच त्याला शहरात आल्यानंतर दारूचं व्यसनही जडलं. त्यामुळे त्याला कॅन्सरचीही (Real life tarzan cancer) लागण झाली. लँगचे मित्र अल्वारो सेरेजो यांनी सांगितले, 'गेल्या काही महिन्यांपासून लँग अतिशय आजारी होता. त्यामुळे त्याला आलेल्या मृत्यूने एक प्रकारे त्याची सुटकाच केली आहे. तो जंगलातून आला होता तेव्हा एकदम वेगळा होता. एकदम निर्मळ होता; मात्र शहरात राहायला आल्यापासून त्याची निर्मळताही नाहीशी झाली होती. मला त्याला अशा स्थितीत पाहणं आवडत नव्हतं. तो खरंच खूप चांगला होता. मी त्याला कधीच विसरू शकणार नाही.' लँगच्या भावानं सांगितलं, 'माणसांमध्ये राहायची समज लँगमध्ये नव्हती. त्याला चांगलं-वाईट अशा गोष्टीही समजत नसत. मी त्याला कोणाला चाकू मारायला सांगितला, तर समोरची व्यक्ती मरू शकते याचा विचारही न करता तो चाकू मारू शकत होता.' लँग जंगलात माकड, पाल, साप असे विविध प्राणी खात होता. त्याला सर्वांत जास्त उंदीर खायला आवडायचं. तसंच, शहरात आठ वर्षं राहूनही त्याला मोजकेच शब्द बोलता येत होते. तो इशाऱ्यांद्वारेच जास्त बोलायचा असंही लँगच्या भावाने सांगितलं.
First published: