पाटणा, 15 सप्टेंबर : सामान्यपणे दाढी (Shaving beard) करायची म्हटली तर एक तर ती स्वतःहून घरी केली जाते किंवा दुसऱ्याकडून करून घ्यायची तर सलूनमध्ये आरामात खुर्चीत बसून केली जाते (Shaving beard Video). फार फार तर ग्रामीण भागात एखाद्या झाडाखाली बसून दाढी करणारा बार्बर तुम्ही पाहिला असेल. पण रस्त्याच्या मध्योमध (Shaving beard on road) तेसुद्धा सायकलवर बसून दाढी करताना कधी पाहिलं आहे (Shaving beard on bicycle).
सायकलवरून बसून रस्त्यातच दाढी करणाऱ्या बार्बरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. सायकलवर बसूनच हजामत केली जाते आहे. सायकलवरील हे अनोखं फिरतं सलून चांगलंच चर्चेत आलं आहे.
View this post on Instagram
ब्युटी ऑफ पटना इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे बिहार आहे आणि इथं काहीच अशक्य नाही. असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
हे वाचा - VIDEO - डान्सिंग आजीने पुन्हा दाखवला आपला जलवा; नातीसोबत केला Cutiepie dance
व्हिडीओत पाहू शकता, दोन व्यक्ती सायकलवर बसलेल्या आहेत. दोन्ही सायकल रस्त्याच्या मधोमध एकत्र उभ्या केलेल्या आहेत. एका सायकलर न्हावी बसला आहे. जो दुसऱ्या सायकलवर हसलेल्या व्यक्तीची दाढी करतो आहे. दाढी करणारी व्यक्तीसुद्धा अगदी आरामात आहे. अशा पद्धतीने दाढी करवून घेताना काही त्रास होतो आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून तरी दिसून येत नाही.
हे वाचा - हे काय नवीन? ट्रॅफिक सिग्नलवर अचानक मॉडेलने सुरू केला डान्स, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण आपली प्रतिक्रिया देत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos