जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हेलिकॉप्टरमधून सायकल घेऊन मारली उडी; पाहा स्टंटचा भयंकर VIDEO

हेलिकॉप्टरमधून सायकल घेऊन मारली उडी; पाहा स्टंटचा भयंकर VIDEO

हेलिकॉप्टरमधून सायकल घेऊन मारली उडी; पाहा स्टंटचा भयंकर VIDEO

क्रिस कॅल या व्हिडीओमध्ये आपल्या स्टॅट्सनी सर्वांनाच हैराण करत आहेत. व्हिडीओमध्ये क्रिस आकाशात उडताना दिसतोय.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 फेब्रुवारी : अनेकदा असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत, ज्यात एखादा व्यक्ती हेलिकॉप्टरमधून पॅराशूट (Parachute) घेऊन उडी मारतो. पण कधी विना पॅराशूट हेलिकॉप्टरमधून, सायकल घेऊन उडी मारताना पाहिलंय का? पण एका व्यक्तीने हे भयंकर धोकादायक कृत्य केलं आहे. यूट्यूबवर हा व्हिडीओ अनेक दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. रेड बुलद्वारा पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण हेलिकॉप्टरमधून सायकल घेऊन उडी मारताना दिसतोय. हा व्हिडीओ एका स्कॉटिश बीएमएक्स रायडर, क्रिस कॅलचा आहे. क्रिस कॅल या व्हिडीओमध्ये आपल्या स्टॅट्सनी सर्वांनाच हैराण करत आहेत. व्हिडीओमध्ये क्रिस आकाशात उडताना दिसतोय. हेलिकॉप्टरमधून पॅराशूटची मदत न घेता, 16 फूट उंचीवरून सायकल घेऊन तो उडी मारतो. हेलिकॉप्टरमधून उडी मारल्यानंतर तो संपूर्ण दुबईत सायकलिंगचे जबरदस्त स्टंट्स करतातही दिसतो.

(वाचा -  नदी पार करणाऱ्या झेब्रावर मगरीचा हल्ला; पाहा नदीतल्या थराराचा VIDEO )

क्रिसचे सायकल घेऊन जगातील सर्वात उंच आणि सुंदर बुर्ज अल अरब हॉटेलच्या छतावरही हैराण करणारे स्टंट्स करतो. क्रिस हेल्मेट घालून 16 फूट उंचीवरून उडी मारण्यासाठी कशाप्रकारे तयार आहेत हे देखील दिसतंय. हा व्हिडीओ मनोरंजनासह अतिशय भीतीदायकही आहे.

(वाचा -  भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि… पाहा VIDEO )

(वाचा -  माकडाच्या पिल्लाचा Bath Time व्हिडीओ VIRAL! अत्यंत दुर्मीळ आहे ही प्रजाती )

क्रिस आपल्या या कामात अतिशय परफेक्शनसह स्टंट्स पूर्ण करतात. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी सुरुवात केली असून त्यांचे अतिशय धोकादायक स्टंट्स पाहून अनेक लोक हैराण आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात