जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Cuteness Alert! माकडाच्या पिल्लाचा Bath Time व्हिडीओ VIRAL! अत्यंत दुर्मीळ आहे ही प्रजाती

Cuteness Alert! माकडाच्या पिल्लाचा Bath Time व्हिडीओ VIRAL! अत्यंत दुर्मीळ आहे ही प्रजाती

Cuteness Alert! माकडाच्या पिल्लाचा Bath Time व्हिडीओ VIRAL! अत्यंत दुर्मीळ आहे ही प्रजाती

आग्नेय आशिया हे या प्रजातीच्या माकडांच्या वस्तीचं ठिकाण आहे. तिथेही जेमतेम 500 माकडं अस्तित्वात आहे. प्राणीसंग्रहालयात जन्माला आलेलं या प्रजातीचं हे पहिलंच माकड आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

फिलाडेल्फिया, 5 फेब्रुवारी : जगभरात अनेक असे लोक आहेत ज्यांचं प्राण्यांवर नितांत प्रेम आहे. अनेक प्राणी-पक्षी मित्रही या सजीवांचं रक्षण करण्यासाठी नेहमी पुढे येतात. प्राण्यांच्या डॉक्टरांनीही चिंताजनक असेलल्या अनेक प्राण्यांचे जीव वाचवल्याच्या अनेक घटना आहेत. असाच एका प्राण्याचा क्यूट व्हिडीओ समोर आला आहे. फिलाडेल्फियातील प्राणी संग्रहालयात François’ langur प्रजातीच्या माकडानं पहिल्यांदाच जन्म घेतला आहे. फ्रान्स्वा लंगूर (François’ langur) नावाच्या जातीची ही माकडं आता दुर्मीळ प्रजातीत मोडतात. आग्नेय आशिया हे या प्रजातीच्या माकडांच्या वस्तीचं ठिकाण आहे. तिथेही जेमतेम 500 माकडं अस्तित्वात आहे. प्राणीसंग्रहालयात जन्माला आलेलं या प्रजातीचं हे पहिलंच माकड आहे, त्यामुळे अर्थातच तो अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लाडाचा विषय आहे. संपूर्ण काळ्या रंगाची आणि काळ्या तोंडावर कडेला पांढरे कल्ले असलेली ही माकडं दिसायला वेगळी दिसतात आणि त्यांची पिल्लं तर खूपच गोड दिसतात. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या माकडाच्या पिल्लाचा एक क्यूट व्हिडीओ शेअर केला आहे. पिल्लाला डॉक्टरांनी अगदी लहान बाळाप्रमाणे आंघोळ घातल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. माकडाच्या पिल्लाला आंघोळ घातल्यानंतर डॉक्टर त्या पिल्लाला एका ड्रायरने सुकवत असल्याचंही पाहायला मिळतंय.

(वाचा -  भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि… पाहा VIDEO )

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, हे माकडाचं पिल्लू फिलाडेल्फियातील प्राणी संग्रहालयात जन्मलं आहे. Quy Bau असं या पिल्लाचं नाव आहे. डॉक्टरांनी एका टबमध्ये या पिल्लाला आंघोळ घातली. त्याला ड्रायरच्या साहाय्याने सुकवलंही. त्यानंतर त्याला एका सीरिनमधून भरवण्यातही आलं. या क्यूट व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत असून त्याला मोठी पसंतीही मिळते आहे.

(वाचा -  कांगारूला त्रास देत होता व्यक्ती; त्याने असा घेतला बदला की…; VIDEO VIRAL )

दरम्यान, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरने माकडांची ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून अतिशय दुर्लभ असल्याचं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात