• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • Shocking Video: सिंहासमोर जमिनीवर झोपून फोटो काढत होता फोटोग्राफर अन्...; पाहा पुढे काय घडलं

Shocking Video: सिंहासमोर जमिनीवर झोपून फोटो काढत होता फोटोग्राफर अन्...; पाहा पुढे काय घडलं

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की जंगलात फोटोग्राफर कॅमेरा घेऊन जमिनीवर झोपलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूने दाट झाडी आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : वाईल्डलाईफ फोटोग्राफी (Wildlife Photography) करणं सोपं काम नाही. ही एक अशी फिल्ड आहे ज्यात घनदाट जंगलात जात भयंकर प्राण्यांना कॅमेऱ्यात कैद करावं लागतं. ऐकताना हे जितकं रोमांचक वाटतं तितकंच प्रत्यक्षात हे काम अतिशय घातक आहे. या फिल्डमध्ये व्यक्तीमध्ये धाडस आणि धैर्य असणं अतिशय गरजेचं आहे. याच कारणामुळे एक चांगला फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरला अनेक तास घनदाट जंगलात प्राण्यांच्यात फिरावं लागतं. सध्या सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हि़डिओ पाहून तुम्हीही फोटोग्राफरच्या हिमतीचं कौतुक कराल. सिंह (Lion) समोर असतानाही तो ज्याप्रकारे जमिनीवर पडून राहतो ते दृश्य हैराण करणारं आहे. रस्त्यावरील खड्ड्याने घेतला इंजिनिअरचा बळी; बसखाली चिरडून मृत्यू, अपघाताचा VIDEO व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की जंगलात फोटोग्राफर कॅमेरा घेऊन जमिनीवर झोपलेला आहे. त्याच्या दोन्ही बाजूने दाट झाडी आहे. याच्या मधूनच एक रस्ता जात असल्याचं दिसतं. इतक्यात सिंह आपल्या बछड्यांसोबत इथून येताना दिसतो. ज्या सिंहाला पाहून जंगलातील बलाढ्य प्राणीही घाबरतात, त्या सिंहापुढे हा फोटोग्राफर अतिशय आरामात झोपलेला दिसतो. व्हिडिओ पाहून असं वाटतं, जणू त्याला सिंहाची काहीच भीतीच नाही. तो अतिशय आरामात सिंहाचे फोटो काढत आहे.
  व्हिडिओ पाहून तुम्हालाही विशेष वाटेल की सिंहासारख्या हिंस्र पाण्यासमोर या फोटोग्राफरने इतकी हिंमत कशी दाखवली. सिंहाने त्याच्यावर हल्ला केला की नाही, याबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही फोटोग्राफरचे धाडस आणि कामाप्रतीची जिद्द याचं कौतुक कराल. लग्नाच्या दिवशीच आईनं नवरीला खोलीत कोंडलं अन्...; VIDEO पाहून बसणार नाही विश्वास हैराण करणारा हा व्हिडिओ helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. एक दिवसापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ आतापर्यंत 4 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. ही संख्या सतत वाढत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: