मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नाच्या दिवशीच आईनं नवरीला खोलीत कोंडलं अन्...; VIDEO पाहून बसणार नाही विश्वास

लग्नाच्या दिवशीच आईनं नवरीला खोलीत कोंडलं अन्...; VIDEO पाहून बसणार नाही विश्वास

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरी ब्रायडल रूममध्ये मेकअप करत असते तेव्हा तिला विश्वासच बसत नाही की तिच्याच आईनं तिला रूममध्ये बंद केलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरी ब्रायडल रूममध्ये मेकअप करत असते तेव्हा तिला विश्वासच बसत नाही की तिच्याच आईनं तिला रूममध्ये बंद केलं आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरी ब्रायडल रूममध्ये मेकअप करत असते तेव्हा तिला विश्वासच बसत नाही की तिच्याच आईनं तिला रूममध्ये बंद केलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 02 नोव्हेंबर : नवरीबाई आपल्या लग्नाच्या दिवशी (Wedding Day) सुंदर दिसण्यासाठी हजारो रुपये खर्च करून अतिशय मेहनतीनं मेकअप करते. तिला तयार करण्यासाठी अनेक लोक मेहनत घेत असतात. लग्नाच्या आधीपासूनच ती आपल्या लग्नाचा ड्रेस (Bride Dress) ठरवते आणि मग लग्नाच्या दिवसाची आतुरतेने वाट बघते. मात्र, जर लग्नाच्या दिवशीच नवरीला रूममध्ये बंद करून ठेवण्यात आलं तर? नवरी ओरडेल आणि लोकांची मदत मागेल. असंच काहीसं सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहायला मिळालं. हैराण करणारी बाब म्हणजे नवरीबाईला रूममध्ये बंद करणारं दुसरं कोणी नसून तिची स्वतःची आई आहे.

18 वर्षाच्या तरुणाने केलं 71 वर्षाच्या महिलेसोबत लग्न; आता जगतायेत असं आयुष्य

व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नाच्या दिवशी जेव्हा नवरी ब्रायडल रूममध्ये मेकअप करत असते तेव्हा तिला विश्वासच बसत नाही की तिच्याच आईनं तिला रूममध्ये बंद केलं आहे. चला तर मग या व्हायरल व्हिडिओबद्दल सविस्तर जाणून घेऊ. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरीबाई अतिशय आनंदात आपल्या ब्रायडल रूममध्ये मेकअप करत आहे. तिला तयार करण्यासाठी एक व्यक्ती तिथे असते.

नवरीच्या मैत्रिणीदेखील यावेळी तिथेच असतात आणि नवरीचा मेकअप करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतात. मात्र, सगळ्यात मजेशीर क्षण तर तेव्हा येतो तेव्हा समजतं की ब्रायडल रूम नवरीच्या आईनं बाहेरून बंद केली आहे. सुरुवातीला तर नवरीला विश्वास बसत नाही. मात्र, नंतर जेव्हा तिच्या मैत्रिणीनं याची खात्री केली तेव्हा ती हैराण झाली.

नवरीबाईला जाणवतं की दरवाजा कोणीतरी बंद केला आहे. यानंतर तिनं मैत्रिणीला विचारलं की काय झालं. यावर मैत्रीण सांगते, की दरवाजा बंद करून गेल्या आहेत. आजची ताजी बातमी, आईनं केलं नवरीला रूममध्ये बंद. हे बोलताच नवरीची रिअॅक्शन पाहण्यासारखी असते. आधी तर हे जाणून नवरीबाई हैराण झाली आणि नंतर जोरजोरात हसू लागली. काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

Online Meeting दरम्यान आंघोळ करीत होता प्रोफेसर, कॅमेरा बंद करायला विसरला अन्...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतील उतरत आहे. इन्स्टाग्रामवर आय डोन्ट सी चीज नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड केला गेला आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं, कँडिड व्हिडिओच्या प्रेमात पडणं. या व्हिडिओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका यूजरनं लिहिलं, हेअरस्टाईल आणि संपूर्ण मेकअप खराब झाला.

First published:

Tags: Bridegroom, Wedding video