मराठी बातम्या /बातम्या /देश /

रस्त्यावरील खड्ड्याने घेतला इंजिनिअरचा बळी; बसखाली चिरडून जागीच मृत्यू, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

रस्त्यावरील खड्ड्याने घेतला इंजिनिअरचा बळी; बसखाली चिरडून जागीच मृत्यू, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या दुचाकीचं पहिलं चाक खड्ड्यात गेलं तेव्हा गाडीचा बॅलन्स बिघडला. यामुळे दुचाकी शेजारून जात असलेल्या बसच्या खाली आली.

  • Published by:  Kiran Pharate

चेन्नई 02 नोव्हेंबर : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) चेन्नईमधून (Chennai) एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे बसखाली चिरडून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू (Software Engineer's Death in Road Accident) झाला. हे घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Footage of Road Accident) कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की सॉफ्टवेअर इंजिनिअर आपल्या बाईकसह बसच्या खाली आला.

विदारक! पोलिसांच्या ताब्यात असताना विवाहितेचा मृत्यू, हुंडाबळीची करूण कहाणी

ही घटना चेन्नईच्या चिन्नामलाई भागात सोमवारी सकाळी 8 वाजून 44 मिनिटांनी घडली. सॉफ्टवेअर इंजिनिअर तमिळनाडूच्या नंगानाल्लुर येथील राहणारा होता. त्याचं नाव मोहम्मद युनुस होतं. त्याचं वय सुमारे ३२ वर्ष होतं. सीसीटीव्ही व्हिडिओत दिसतं, की रस्त्याच्या मध्येच एक खड्डा होता. यात पावसाचं पाणी साठलेलं होतं. जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या दुचाकीचं पहिलं चाक खड्ड्यात गेलं तेव्हा गाडीचा बॅलन्स बिघडला. यामुळे दुचाकी शेजारून जात असलेल्या बसच्या खाली आली. या घटनेत बसखाली चिरडल्याने इंजिनिअरचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. बसने चिरडल्याने जागीच इंजिनिअरचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर या तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बससोबत इंजिनिअरचा अपघात झाला ती चेन्नईच्या वसंतनगर येथून चिन्नामलाई येथे जात होती.

दिवाळीआधी देशात घातपाताचं संकट; 46 रेल्वेस्थानकं बॉम्बने उडवण्याची धमकी

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या इंजिनिअरचा मृत्यू झाला. घटनेनंतर हा खड्डा बुजवण्यात आला आहे आणि ट्रॅफिक क्लिअर करण्यात आलं. या घटनेनंतर लोक प्रशासनावर सवाल उपस्थित करत आहेत. अशीच एक घटना 2019 मध्ये चेन्नईच्या पूनामल्ली भागात घडली होती. यात 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. बाईकमध्ये अचानक ब्रेक लागल्यामुळे ही महिला ट्रकखाली आली होती.

First published:

Tags: Bike accident, Shocking video viral