नवी दिल्ली 19 जून : काही लोकांना आयुष्यात नेहमी काहीतरी वेगळं आणि धाडसी कृत्य करण्याची इच्छा असते. हे लोक स्वतःला खतरो के खिलाड़ीच समजतात. यामुळे हे लोक विचित्र स्टंट कऱण्यासोबत भयंकर जंगली प्राण्यांच्या आजूबाजूलाही भटकत राहातात. नुकताच सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडिओ व्हायरल (Dangerous Video Viral) झाला आहे. मित्रांसोबत वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात; विचित्र घटनेचा VIDEO व्हायरल सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर FailArmy नावाच्या एका पेजवरुन हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही भीती वाटेल. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक महिला पॉसम नावाच्या एका जंगली उंदराला (Wild Rat) प्रेमानं जवळ बोलवत असते. इतक्यात हा उंदीर तिच्या ड्रेसला येऊन चिटकतो आणि महिला त्याला बाहेर काढण्यासाठी उड्या मारू लागते.
VIDEO: युवकानं केली दुकानात चोरी; मात्र एका नियमामुळे कोणीही अडवू शकलं नाही इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ रिल्सच्या स्वरुपात पोस्ट केला गेला आहे. आतापर्यंत 50 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. पॉसम (Possum Animal) हा जंगलांमध्ये आढळणारा एक जंगली उंदीर आहे. काही ठिकाणी त्याला ओपॉसम असंही म्हटलं जातं. मात्र, हे दोन्ही एकमेकांपेक्षा वेगळे असतात. साधारणपणे हे उंदीर चावत नाहीत. मात्र, जेव्हा त्यांना धोका जाणवतो तेव्हा ते चावणं सोडत नाहीत. यांच्या संपर्कात आल्यानं माणसाला गंभीर आजारही होऊ शकतात. याच कारणामुळे रस्त्यावर आढळणाऱ्या आणि जंगली जनावरांपासून सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा हे प्राणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

)







