नवी दिल्ली 19 जून : तुमच्या समोर एखादा व्यक्ती स्टोरमधून दिवसाढवळ्या सामान चोरी करून बॅगमध्ये भरत असेल तर तुम्ही काय कराल? एकतर तुम्ही पोलिसांकडे याबाबत तक्रार कराल किंवा मग स्वतःच याप्रकरणात काहीतरी करून त्याला अडवण्याचा प्रयत्न कराल. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे, ज्यात चोर ढिवसाढवळ्या सर्वांच्या समोर सामान चोरी (Shoplifter Video) करत राहिला आणि सगळेजण उभा राहून फक्त पाहात राहिले. ही घटना अमेरिकेच्या सॅन फ्रेन्सिस्को शहरात घडली आहे. प्रसिद्ध रिटेल स्टोर वॉलग्रीन्समध्ये ही चोरी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ एका लोकल रिपोर्टरनं शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Video Viral) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की हा व्यक्ती सायकलवर आला असून एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये तो सामान भरत आहे. इथे उपस्थित असलेली एक महिला आणि आणखी एक व्यक्ती त्याचा व्हिडिओ शूट करत आहेत. Pune Crime: सुनेवर चाकू हल्ला करत सासऱ्याची आत्महत्या, धक्कादायक घटनेनं खळबळ साल 2014 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये एक कायदा पारित झाला. यानुसार, 950 डॉलर्सपेक्षा कमी किमतीच्या चोरीच्या घटना या किरकोळ गुन्ह्याच्या यादीत येतील. इतकंच नाही, तर याला गंभीर अपराधही मानलं जाणार नाही. अशात आता कोरोना काळात बेरोजगारी वाढत असल्यानं दुकानातून सामान चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
This just happened at the @Walgreens on Gough & Fell Streets in San Francisco. #NoConsequences @chesaboudin pic.twitter.com/uSbnTQQk4J
— Lyanne Melendez (@LyanneMelendez) June 14, 2021
मिल्खा सिंग यांना Flying Sikh नाव का पडलं? आयुष्यात या गोष्टीची नेहमी राहिली खंत मागील पाच वर्षांमध्ये या कंपनीनं आपले 17 स्टोर बंद केले आहेत. परिस्थिती इतकी वाईट आहे, की सीवीएस रिटेल कॉर्पोरेशननं आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे, की चोरी करण्यासाठी आलेल्या लोकांच्या मध्ये येऊ नका. कारण हे चोर हल्ला करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना जखमी करू शकतात. कोरोना काळात या कंपन्यांना आपले स्टोर सुरुही ठेवावे लागले. तसंच अशा चोरीच्या घटनांमुळे आर्थिक नुकसानही सहन करावं लागलं.