मित्रांसोबत वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात; विचित्र घटनेचा VIDEO तुफान व्हायरल

सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Instagram Reels Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक लग्नसमारंभात डान्स करताना दिसतात

सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Instagram Reels Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक लग्नसमारंभात डान्स करताना दिसतात

  • Share this:
    नवी दिल्ली 19 जून : सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) होत राहतात. लग्नातील छोट्या छोट्या परंपरा इतक्या खास असतात की त्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करून ठेवल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एका लग्नातील व्हिडिओ (Wedding Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोरोनामुळे आपल्या घरातच असलेल्या लोकांचं हे व्हिडिओ चांगलंच मनोरंजन करतात. दोन बायका फजिती ऐका! विवाहित तरुणाला GF सोबतही करावं लागलं लग्न; आता... सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Instagram Reels Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक एका लग्नसमारंभात डान्स करताना दिसतात. सगळेच मस्तीच्या मूडमध्ये असल्याचं दिसतं. इतक्यात वातावरण आणखी खास करण्यासाठी नवरदेवाला एक मित्र खांद्यावर उचलून घेतो. त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
    मनाचा मोठेपणा! नवरीनं लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सवतीसाठी दान केली किडनी मित्र नवरदेवाला खांद्यावर घेऊन डान्स करत असतो, मात्र इतक्यात त्याचा पाय घसरतो आणि नवरदेव जमिनीवर कोसळतो. ही घटना घडताच सगळे नातेवाईक नवरदेवाला उठवण्यासाठी धाव घेतात. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक यावर मजेशीर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Niranjan नावाच्या एका व्यक्तीनं शेअर केला आहे. आतापर्यंत व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नसून यावर ते निरनिराळ्या कमेंट करत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published: